Agriculture Loan Access Problems: किसान क्रेडिट कार्ड योजना असूनही, शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळविणे ही आजही अवघड प्रक्रिया बनली आहे. कारण शेतकऱ्यांना कर्ज मिळविण्यासाठी अनेक कागदपत्रांच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून जावे लागत आहे. त्यांना तलाठी आणि तहसील कार्यालयांच्या अनेक फेऱ्या माराव्या लागतात. त्यासाठी ग्रामीण कर्ज सुविधा व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले आहे. .‘नागरी सेवा दिना’निमित्त आयोजित कृषिविषयक चर्चासत्रात ते बोलत होते. चौहान यांनी पुढे म्हटले आहे, की सध्याची यंत्रणा ज्या लोकांसाठी उभारण्यात आली आहे, त्याच लोकांना सेवा देण्यात ती अपयशी ठरली आहे..Farmer Loan Waiver : संपूर्ण कर्जमाफी, ऊसाला ४ हजार ५०० रुपयांचा दर, धानाला ३ हजार ५०० हमीभाव, महिलांना दरमहा २ हजार ५०० रुपये देण्याचे आश्वासन; अभिनेते विजय यांच्या पक्षाचा जाहीरनामा .‘‘शेतकरी भिकारी नसून, तो आपला हक्क, गरजांसह स्वाभिमानाने मोठ्या आशेने व्यवस्थेकडे येतो,’’ असे ते म्हणाले. पण पदांवर असलेल्या अधिकाऱ्यांना अनेकदा या गोष्टीचा विसर पडत असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली..ग्रामीण बँकिंग क्षेत्रातील अडचणी सांगताना कृषिमंत्री म्हणाले, की शेतकऱ्यांना बँकेच्या शाखांपर्यंत जाण्यासाठी ८ ते १० किलोमीटर पायपीट करावी लागते. त्यानंतर काउंटरसमोर लागलेल्या लांब रांगा आणि अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना निराश होऊन घरी परतावे लागते. मनरेगा मजुरीपासून ते पीएम किसान योजनेचा हप्ता थेट लाभ हस्तांतराच्या (डीबीटी) माध्यमातून ग्रामीण बँकांतील खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जमा होतो. पण कमी मनुष्यबळामुळे बँक कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे ग्रामीण बँकिंग व्यवस्थेतील मनुष्यबळावर गंभीरपणे पुनर्विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली..Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीचा प्रस्ताव विचाराधीन नाही; अर्थमंत्र्यांनी दिली माहिती.गहू खरेदीदरम्यान उपग्रह आधारित पडताळणी प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी त्या वाढल्या आहेत. त्यासाठी डिजिटलायझेशन करताना वास्तव परिस्थिती जाणून घेतली पाहिजे, असे त्यांनी सूचित केले..एकात्मिक शेतीवर बोलताना मंत्री चौहान यांनी असा दावा केला, की एक ते अडीच एकर जमीन असलेले छोटे अथवा सीमांत शेतकरी केवळ धान्यावर अवलंबून राहू शकत नाही. फलोत्पादन, पशुपालन, मत्स्यपालन अथवा मधमाशीपालन यांसारख्या क्षेत्रात विविधता आणण्यासाठी भांडवलाची गरज असते. पण भांडवल बहुतांश लोकांकडे नसते. तसेच केवळ अनुदानातून ते मिळवणे अशक्य आहे, असेही त्यांनी नमूद केले..‘वन टाइम सेटलमेंटवर गांभीर्याने विचार करा’शेतकऱ्यांना कमी भावात शेतीमाल विकण्यापासून संरक्षण देण्यासाठी ‘वेअरहाउस रिसीट’ कर्ज हा एक प्रभावी पर्याय आहे. पण ही योजना सर्वांसाठी सहजपणे उपलब्ध करण्याची गरज आहे. एका शेतकऱ्याने घेतलेल्या १८ लाख रुपयांच्या कर्जाची रक्कम ४० लाख रुपयांपर्यंत वाढल्याचे उदाहरण देत, त्यांनी बँकांना एक व्यावहारिक उपाय म्हणून वन टाइम सेटलमेंटवर गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.