Nanded News: प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत ‘हर घर जल’ योजना सुरू केली. मात्र, किनवट तालुक्यात ही योजना निधीअभावी रखडल्याचे चित्र असून ११४ पैकी तब्बल ८५ गावे अजूनही नळपाण्यापासून वंचित आहेत..तालुक्यातील अनेक गावांमध्ये या योजनेची कामे दीड वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या आशेने वाट पाहणाऱ्या ग्रामस्थांची निराशा वाढत आहे. .Har Ghar Jal Mission : ‘हर घर जल’ योजनेबाबत संभ्रम.मार्च महिना सुरू होताच उन्हाळ्याची चाहूल लागली असताना दुर्गम भागातील महिलांना अजूनही डोक्यावर घागर घेऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. .Jal Jeevan Mission Scheme : ‘हर घर जल’ची गावांना प्रतीक्षाच ; १२३ पैकी ४४ गावांमध्ये काम सुरू.या योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला दररोज ५५ लिटर स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण महिलांची पाण्यासाठीची पायपीट थांबवणे हा उद्देश आहे..कंत्राटदारांना नोटिसायोजनेला आता २०२८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी संबंधित कंत्राटदारांना विभागामार्फत दर महिन्याला नोटिसा देण्यात येत असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता एफ.एफ. बघेले यांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.