Leopard Terror: एखाद्या बिबट्याने एखाद्या क्षेत्रात माध्यमे म्हणतात तसा ‘धुमाकूळ’ घातला तर NTCA च्या सूचनांनुसार सर्व प्रथम त्याला जंगलाच्या दिशेने हाकलून जगण्याची एक संधी द्यावी लागते. शक्य नसेल तर पिंजऱ्यात पकडावे लागते, तेही शक्य झाले नाही तर प्राण्याला बेशुद्ध करावे लागते. प्राण्याला ठार मारणे हा सर्वांत शेवटचा पर्याय आहे.