Summer Water Crisis: उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना किल्लारी गावात पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. भूकंपासाठी ओळख असलेल्या या गावात आता ‘पाणीटंचाईचा भूकंप’ जाणवत असून, दोन महिन्यांपासून नागरिक त्रस्त आहेत..सुमारे ३० हजार लोकसंख्या असलेल्या गावाला चार प्रमुख स्रोतांद्वारे पाणीपुरवठा होत होता. मात्र, सध्या विहिरी व धरणांवरील वीजबिल थकबाकीमुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. माकणी धरणातून पाणी सोडण्याचे आश्वासन दिले जात असले तरी प्रत्यक्षात पुरवठा सुरू झालेला नाही. .Rural Water Crisis: रायगडाच्या पायथ्याशी जलसंकट.परिणामी, नळ कोरडे पडले असून नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. पाणीटंचाईमुळे स्वच्छतेच्या समस्या वाढल्या असून आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. माकणी धरणातून नियमित पाणी सोडणे, वीजकनेक्शन सुरू करणे व टँकरची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अन्यथा पुढील काळात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे..Rural Water Crisis: ग्रामीण भागातील पाणी शुद्ध आहे का?.५०० लिटरसाठी १५० रुपयांपर्यंत खर्चभरउन्हाळ्यात ही समस्या अधिक तीव्र झाली आहे. महिलांसह मुलांना पाण्यासाठी दूरच्या विहिरी किंवा हातपंपांच्या ठिकाणी पायपीट करावी लागते. अनेक कुटुंबे ५०० लिटर पाण्यासाठी १२५ ते १५० रुपयांपर्यंत खर्च करत आहेत. शेतकरी, मजूर, महिलांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनाच या पाणीटंचाईचा फटका बसला आहे. नळातून पाणी येत नाही, तर काय करावे मुलांना शाळेत पाठवायचे की पाण्यासाठी रांगेत उभे करायचे, असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत..प्रशासनांकडून आश्वासनांचे नुसतेच गाजरग्रामपंचायत आणि प्रशासनाकडून येणाऱ्या आश्वासनांवर ग्रामस्थांचा विश्वास उडाला आहे. दोन दिवसांत पाणी येईल असे सांगितले जाते, पण प्रत्यक्षात काहीच होत नाही. वीजबिल थकबाकी, पाइपलाइनमधील गळती, देखभालीचा अभाव आणि अपुरे नियोजन यामुळे ही समस्या निर्माण झाल्याची चर्चा आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.