Rain Alert: जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने जुलै व ऑगस्ट महिन्यात खोपोली व खालापूर परिसरात दमदार हजेरी लावली. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस तालुक्यातील प्रमुख धरणे तसेच गावोगावी असलेले पाझर तलाव तुडुंब भरले आहेत. त्यामुळे खालापूर तालुक्याची जलसंपदा मजबूत झाली असून, आगामी हिवाळा व उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा कमी होण्याची शक्यता आहे. .खालापूर तालुक्यातील अनेक गावांच्या पाणीपुरवठ्याचा आधार असलेली आडोशी, डोणवत आणि कलोते-मोकाशी ही प्रमुख धरणे पावसामुळे भरली आहेत. तसेच भिलवले धरणातून प्रामुख्याने शेतीसाठी, तर कलोते-मोकाशी व डोणवत धरणातील पाण्याचा वापर शेती, उद्योग आणि विविध गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी केला जातो..Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात पावसाची उघडीप.कलोते-मोकाशी धरणाची पाणी साठवण क्षमता ४.१९ दशलक्ष घनमीटर असून, या धरणावर कलोतेसह खालापूर, वनखळ, काढरोली, नदोडे तसेच आदिवासी वाड्यांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. यंदाच्या समाधानकारक पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. खोपोली-पेण मार्गावरील डोणवत धरणही ओव्हरफ्लो झाले आहे..Nanded Rain Update : नांदेड जिल्ह्यात सर्वदूर पावसाची अद्याप प्रतीक्षा.या धरणामुळे तांबाटी, वावोशी, सावरोली, डोणवत परिसरातील अनेक गावांना तसेच आदिवासी वाड्यांना पाणीपुरवठा होतो. याशिवाय परिसरातील औद्योगिक क्षेत्र, लघुउद्योग आणि आदिवासी बांधवांच्या भाजीपाला शेतीलाही या पाणीसाठ्याचा मोठा फायदा होणार आहे. दरम्यान, नवी मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरणही तुडुंब भरले आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता सुमारे १९०.९० दशलक्ष घनमीटर असून, पाणीसाठ्यामुळे नवी मुंबईच्या पाणीपुरवठ्यालाही दिलासा मिळाला आहे..दमदार पाऊसखालापूर तालुक्यातील मोरबे, आडोशी, डोणवत, भिलवले आणि कलोते-मोकाशी या धरणांबरोबरच आत्करगाव, नढाळ, उसरोली आणि विविध गावांतील पाझर तलावही भरले आहेत. रायगड जिल्ह्यात पाटबंधारे विभागाच्या अखत्यारितील २८ धरणांसह अनेक पाझर तलाव आहेत. यंदाच्या दमदार पावसामुळे जलसाठ्यांची स्थिती समाधानकारक झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.