Palghar News : मोखाडा तालुक्यातील खोडाळा ही मुख्य महत्त्वाची बाजारपेठ आहे. खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुक्यातील गावपाड्यांसह लगतच्या जव्हार, शहापूर, वाडा आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे आरोग्य केंद्रावर रुग्णांची नियमित गर्दी असते. .येथे अद्ययावत आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून मागील ११ वर्षांच्या मागणीनंतर ग्रामीण रुग्णालयाला गत साली मंजुरी मिळाली आहे. मात्र ग्रामीण रुग्णालय बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने ग्रामीण रुग्णालयाचे घोंगडे भिजत पडले आहे..Rural Health System : ग्रामीण भागाचे आरोग्य दुर्लक्षित.खोडाळा गाव व परिसरातील वाढत्या लोकसंख्येसह प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत २४ महसुली गावे आणि जवळपास ६० गावखेडी येतात. त्यांची लोकसंख्या ३० हजारांच्या पुढे आहे. त्यातच नाशिक जिल्ह्यातील श्रीघाट, देवगाव, वैतरणा, आस्वली, कोजुली, सामुंडी ते थेट पहिणा या त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातील रुग्ण खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येतात. .याबरोबर शहापूर तालुक्यातील विहीगांव, माळ, दापूरवाडा तालुक्यातील तीळमाळ, भिलमाळ, ओगदा आणि जव्हार तालुक्यातील भुरीटेक गावासह लगतच्या खेडोपाड्यातील रुग्णांचा भारही खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला सोसावा लागतो आहे..Rural Health Center : ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रे कमकुवत.तब्बल २१ उपकेंद्रांची उपाययोजनामोखाडा तालुक्यातील कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रे ४, आरोग्य पथके, दक्षता पथके ३, रेस्क्यू कॅम्प ७, आयुर्वेदिक दवाखाना १ आणि तब्बल २१ उपकेंद्रांची उपाययोजना केली आहे. त्यापैकी खोडाळा विभागात १ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३ आरोग्य पथके, ६ उपकेंद्रे आणि दोन रेस्क्यू कॅम्पच्या माध्यमातून जुजबी आरोग्यसेवा कार्यरत आहे..येथील आम रुग्णांना अधिकची आरोग्यसेवा मिळविण्यासाठी जव्हार अथवा नाशिक येथील जिल्हा रुग्णालयावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना स्थानिक ठिकाणीच उत्तम आरोग्यसेवा मिळावी शासनाने यासाठी खोडाळा ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी दिली आहे.\.खोडाळा ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामासाठी ग्रामपंचायतीने सुचवलेल्या ५२८ आणि ५९८ या दोन गट क्रमांकांच्या जागेची मोजणी, भूमी अभिलेख कार्यालयाकडून २७ मे रोजी करण्यात आली आहे. मात्र त्याबाबतची कागदपत्रे अजूनही आमच्याकडे उपलब्ध झालेली नाही.- भाऊसाहेब चत्तर, तालुका वैद्यकीय अधिकारी, मोखाडा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.