Konkan Heavy Rain Landslide: खेड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दहिवली येथील शेलारवाडीत सोमवारी (ता. ७) रात्री घरावर डोंगराचा भाग कोसळून तिघे जण ढिगाऱ्याखाली अडकले. यापैकी एका महिलेला बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले असून, उर्वरित दोघांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे..सोमवारी रात्री घरावर दरड कोसळल्यानंतर कल्पना शेलार (वय ७५) यांना ग्रामस्थांनी जिवाची पर्वा न करता घराचे लाकडी भाग कापून सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे तळे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले..Patan Village Landslide: पाटण गावात दरड कोसळून तिघांचा मृत्यू.मात्र, शांताराम बाळा शेलार (वय ८५) आणि सतीश शेलार (वय ३५) हे घराच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने त्यांच्याबाबत चिंता व्यक्त केली जात असून, त्यांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे..शांताराम आणि सतीश (वय ३५) हे मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे..Heavy Rainfall: सोयगाव तालुक्यातील बनोटी मंडलात अतिवृष्टी; ‘खडकी’ला पूर.दरम्यान, दहिवली येथील शेलारवाडीत झालेल्या भूस्खलनाची माहिती मिळताच पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या वारसांना शासनातर्फे तातडीने चार लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश दिल्याचे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले..जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरखेड तालुक्यातील जगबुडी नदीची पाणीपातळी ७.५० मीटरपर्यंत पोहोचली असून, नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. तसेच वाशिष्ठी, अर्जुना आणि कोदवली या नद्यांही दुथडी भरून वाहत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.