Pune ZP Panchayat Samiti Election Results 2026: पुणे जिल्ह्यामधील खेड पंचायत समिती निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली आहे. येथे शिवसेनेने १६ पैकी ९ जागांवर विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले आहे. तर त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत ५ जागा मिळाल्या आहेत. पण पक्षाला विजय मिळाला असला तरी खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे यांच्या बहिणीला पराभवाला सामोरे जावे लागले आहे..या निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे तसेच त्यांच्या पक्षातील कोणत्याही मोठ्या नेत्याने सभा घेतली नव्हती. तरीही खेडमध्ये ठाकरेंची मशाल धगधगली आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ६ जागा मिळाल्या आहेत. जिल्हा परिषदेत त्यांच्या ३ उमेदवारांनी विजय मिळवला आहे. खेड पंचायत समिती निवडणुकीत शिंदे सेनेला १ जागा मिळाली आहे. .Solapur ZP Election Result 2026: माळशिरसमध्ये जानकरांना धक्का, संस्कृती सातपुते विजयी, पत्नीच्या विजयानंतर राम सातपुतेंनी दंड थोपटले.पुण्यात अजितदादांच्या पक्षाचे निर्विवाद वर्चस्व पुणे जिल्हा परिषदेच्या एकूण ७३ जागांपैकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ४७ जागांवर निर्णायक आघाडी घेत बहुमत सिद्ध केले आहे. भाजप ९ आणि शिंदे सेना ४ जागांवर आघाडीवर आहे. तर ठाकरेंची शिवसेना ६ जागांवर आघाडीवर आहे. जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत अजितदादांच्या पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. पक्षाच्या विजयानंतर अजितदादांच्या आठवणीने कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. .Parbhani ZP Election Results: परभणीकरांनी घराणेशाहीला नाकारलं, माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांच्या कुटुंबातील चौघांचा पराभव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.