Maharashtra Farming Update: गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात पावसाने जोर धरला असून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, तसेच कोकणातील काही भागांत जोरदार पावसाची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी पुरेशा पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीची लगबग सुरू झाली आहे. मात्र काही ठिकाणी अद्याप पुरेशा पावसाची आतुरता आहे..रविवारी (ता. २८) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील अंजनी बु. येथे सर्वाधिक १६३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मॉन्सून उत्तरेकडे सरकत असताना मध्यंतरी पावसाने काहीशी उघडीप दिली होती. त्यानंतर पुन्हा पावसाचे वातावरण तयार झाले होते..गेल्या २४ तासांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची तीव्रता विभागानुसार वेगवेगळी राहिली. कोकणात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झाला, तर मध्य महाराष्ट्रात काही भागांत जोरदार, काही ठिकाणी मध्यम आणि उर्वरित भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची नोंद झाली..Paddy Sowing: सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवडीला प्रारंभ.रायगड, सिंधुदुर्गमध्ये जोरदार सरीकोकणात रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता. रायगडमधील चरी परिसरात सर्वाधिक पाऊस झाला असून, अलिबाग व रामराज परिसरातही चांगला पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण, वैभववाडी, वालावल, आचरा, आंबेरी, पिंगळी, वेतोरे आणि परिसरात मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. ठाणे जिल्ह्यात मात्र तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला..मध्य महाराष्ट्राला पावसाचा दिलासामध्य महाराष्ट्रात सातारा आणि नाशिक जिल्ह्यांत पावसाचा प्रभाव अधिक जाणवला. सातारा जिल्ह्यात होळ परिसरात जोरदार पाऊस झाला, तर महाबळेश्वरसह काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. नाशिक जिल्ह्यात काळवाडी, नागरसूळ, आंदरसूल, नायडुंगरी या भागांत चांगला पाऊस झाला, तर येवला व परिसरात मध्यम पावसाची नोंद झाली. सोलापूर जिल्ह्यात कामटी, अक्कलकोट, मैंदर्गी व चपलगाव परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस झाला, तर इतर भागांत हलक्या ते मध्यम सरी पडल्या..पुणे जिल्ह्यात वेल्हा आणि भोर परिसरात समाधानकारक पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यात काजगाव परिसरात चांगला पाऊस झाला, तर अहिल्यानगर जिल्ह्यात कोंभाळी, अरणगाव आणि कर्जत परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. धुळे व सांगली जिल्ह्यांतही काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला..Paddy Sowing: भोरमध्ये भात पेरणीला वेग.मराठवाड्यात पावसाचा जोर वाढलामराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने सुरुवात केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शनिवारी (ता. २७) आणि रविवारी (ता. २८) तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. या मराठवाड्यात ५४ मंडळांत हलका ते मध्यम पाऊस झाला. रविवारीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम राहिला. फुलंब्री मंडळात ८८ मिलिमीटर, जानेफळ येथे ५८, गरज येथे ५७, पिशोर येथे ४७ आणि सुलतानपूर येथे ४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. .जालना जिल्ह्यात शनिवारी २१ मंडलांत हलका पाऊस झाला. अंबड तालुक्यातील पानेगाव येथे वीज पडून एका म्हशीचा मृत्यू झाला. बीड जिल्ह्यात ५६ मंडलांत हलका पाऊस झाला असून पाली येथे ४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. परभणी जिल्ह्यात ५२ पैकी ४० मंडलांत सरासरी ५.२ मिलिमीटर पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात ४० पैकी २३ मंडलांत सरासरी २.२ मिलिमीटर पाऊस झाला. रविवारी गोरेगाव येथे ८६ मिलिमीटर, बासंबा येथे ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली..विदर्भात अनेक ठिकाणी पाऊसविदर्भातील अनेक भागांत झालेल्या मुसळधार पाऊस झाला. विशेषतः बुलडाणा जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक १६३ मिलिमीटर पावसाची नोंद अंजनी बु. येथे झाली. त्यानंतर लोणी येथे १०८ मिलिमीटर, मेहुनाराजा येथे ७९ मिलिमीटर, अंजनी खुर्द येथे ७२ मिलिमीटर, डोणगाव येथे ७० मिलिमीटर, तर कल्याणा आणि मेहकर येथे प्रत्येकी ६८ मिलिमीटर पाऊस झाला. .अकोला जिल्ह्यातही पावसाने दमदार हजेरी लावली. अकोला शहरात ५० मिलिमीटर, तर कौलखेडा येथे ५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याशिवाय वाशीम जिल्ह्यातही विविध भागांत पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. पावसामुळे काही ठिकाणी सखल भागांत पाणी साचले आहे..विभागनिहाय ठळक पावसाची नोंद (मिलिमीटरमध्ये)कोकण : चरी ५२, मालवण ३६, वैभववाडी ३४, वालावल ३०, आंबेरी २८, आचरा २७पश्चिम महाराष्ट्र : होळ (सातारा) ६६, काळवाडी (नाशिक) ६५, नागरसूळ ५९, आंदरसूल ५८, कामटी (सोलापूर) ४७, वेल्हा (पुणे) ४०मराठवाडा : फुलंब्री ८८, गोरेगाव (हिंगोली) ८६, जानेफळ ५८, गरज ५७, बासंबा ५०, पिशोर ४७विदर्भ : अंजनी बु (बुलडाणा) १६३, लोणी १०८, उमरखेड-विडूळ (यवतमाळ) ८८, मेहुनाराजा ७९, मालेगाव (वाशीम) ७६, अंजनी खुर्द ७२..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.