Pune News : मे महिन्यापासून दमदार पाऊस पडला. यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला लवकर सुरुवात केली. आतापर्यंत पुणे विभागात सरासरी १२ लाख ५६ हजार ४३९ हेक्टरपैकी १३ लाख ७० हजार ९३९ हेक्टर म्हणजेच १०९ टक्के पेरा पूर्ण झाला आहे. अनेक ठिकाणी उशिराने पेरणी केली आहे..खरिपाच्या सुरुवातीली जून आणि जुलै महिन्यांत जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांना आधार मिळाला. ऑगस्टमध्ये नगरमध्ये ८६ टक्के, पुणे ६० टक्के, तर सोलापूरमध्ये १२४ टक्के पाऊस पडला. त्यामुळे पिकांची चांगलीच वाढ झाली आहे. परंतु अनेक ठिकाणी रोग-किडीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे..Kharif Sowing 2025: तीन जिल्ह्यांत २० लाख ४८ हजार हेक्टरवर पेरणी.अहिल्यानगरमध्ये अकोला तालुक्यात भात पीक वाढीच्या अवस्थेत असून पीक परिस्थिती समाधानकारक आहे. बाजरी पीक फुटवे फुटलेले असून पीक फुलोरा ते पोटरी अवस्थेत आहे. मका पीक कणसे लागण्याच्या व काही भागात कणसे परिपक्वतेच्या अवस्थेत आहे. तूर पीक वाढीच्या अवस्थेत असून पीक परिस्थिती समाधानकारक आहे..मूग व उडीद पीक काढणीच्या अवस्थेत असून जवळपास सर्वच तालुक्यांत ६० ते ६५ टक्के क्षेत्रावरील काढणी झाली आहे. तीळ पीक वाढीच्या व फुलोरा अवस्थेत आहे. सूर्यफूल पीक ही जोमात आहे. भुईमूग पीक फुलोरा व आरे लागण्याच्या अवस्थेत आहे. सोयाबीन पीक शाखीय वाढ व शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पीक वाढीच्या, पाते फुटण्याच्या व बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहे..Kharif Sowing 2025: सांगली जिल्ह्यात खरीप पेरणी ९५ टक्क्यांवर.पुणे जिल्ह्यात खरीप हंगामातील भात पीक वाढीच्या अवस्थेत आहे. बाजरी, मका पीक दाणे भरण्याच्या ते फुलोरा येण्याच्या अवस्थेत आहे. मूग पीक काढणीच्या अवस्थेत आहे. सोयाबीन पिकालाही फुलारा आला आहे.सोलापूरमध्ये खरीप हंगामातील बाजरी पीक पोंगा ते काही ठिकाणी फुलोरा अवस्थेत आहे. मका पीक काही ठिकाणी पोंगा ते काही ठिकाणी फुलोरा अवस्थेत आहे. मूग शेंगा लागणीच्या अवस्थेत असून लवकर पेरणी झालेल्या भागात मूग पीक शेंगा पक्वतेच्या ते काढणीच्या अवस्थेत आहे. .उडीद पीक फुलोरा ते शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून पीक परिस्थिती समाधानकारक आहे. तूर पीक वाढीच्या ते फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहे. मागील काही दिवसांत झालेल्या पावसामुळे उ. सोलापूर, द. सोलापूर, अक्कलकोट तालुक्यांमध्ये ४१४७२ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.पुणे विभागातील जिल्हानिहाय पेरणी (हेक्टरमध्ये)जिल्हा सरासरी क्षेत्र पेरणीचे क्षेत्र टक्केअहिल्यानगर ७१६२०९ ७१७७०९ १००पुणे २०२२६३ २०७३९९ १०३सोलापूर ३,३७,९६७ ४,४५,८३१ १३२विभाग १२५६४३९ १३७०९३९ १०९.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.