Farmers Advised: यंदाचा खरीप हंगाम ‘एल निनो’च्या सावटाखाली असण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांनी या वर्षी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे..पॅसिफिक महासागरातील तापमानवाढीमुळे मॉन्सून कमकुवत होणे, पावसाचे आगमन उशिरा होणे, पावसाच्या दोन सत्रांमध्ये मोठा खंड पडणे किंवा एकूण पर्जन्यमान कमी राहणे, असे परिणाम जाणवू शकतात. जिल्ह्यात दरवर्षी चांगला पाऊस होतो. मात्र एल निनोमुळे पावसात खंड पडण्याची शक्यता आहे..Kharif Season Planning: निविष्ठांच्या सुरळीत पुरवठ्यासाठी अचूक नियोजन करा : पालकमंत्री फुंडकर.सिंधुदुर्गातील बहुतांश भातशेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. वरकस जमिनीतील भातरोपांची पुनर्लागवड पाऊस सुरू असतानाच केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच खबरदारी घेणे आवश्यक आहे. एल निनोमुळे खरीप हंगामातील पेरणी लांबणीवर पडू शकते..Kharif Season: खरीप परीक्षा बघणार.मातीतील ओलावा लवकर कमी झाल्याने पिकांवर ताण येतो. त्यामुळे पिकांची वाढ खुंटून उत्पादनात घट होण्याची शक्यता असते. विशेषतः पिके फुलोऱ्यावर असताना पाण्याचा तुटवडा भासल्यास मोठे नुकसान होऊ शकते..पावसाचे पाणी शेतातच मुरवण्यासाठी उताराला आडवी नांगरणी, योग्य मशागत आणि समतल पातळीवर पेरणी करावी. तसेच बाष्पीभवन रोखण्यासाठी प्लॅस्टिक किंवा पालापाचोळ्याच्या जैविक आच्छादनाचा वापर करावा. वाणांची निवड करतानाही दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.