Amaravati News : खरीप हंगामात जिल्ह्यातील पेरणीखालील ९९ टक्के क्षेत्रापैकी बहुतांश क्षेत्रात कीडरोगांचे आक्रमण झाले आहे. तूर व कापसावर मर, सोयाबीनवर हुमणी अळीसह येलो मोझॅकचा हल्ला झाला. यातच मूग, उडीद काढणीवर असताना पावसामुळे शेंगा खराब होऊ लागल्या आहेत. त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. .जिल्ह्यात खरीप हंगामात सहा लाख ८२ हजार हेक्टर सरासरी पेरणीक्षेत्रापैकी सहा लाख ७७ हजार क्षेत्रात पेरणी झाली आहे. या हंगामातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनची दोन लाख ४६ हजार, कापसाची दोन लाख ६८ हजार व तुरीची एक लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सोयाबीनवर हुमणी अळीबरोबर येलो मोझॅक, चक्रीभुंगाचे आक्रमण झाले आहे..Heavy Rain Crop Damage : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील सहा मंडलांत अतिवृष्टी .सततच्या पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने कापसावर काही ठिकाणी मर रोगाची लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. काही तालुक्यांत रसशोषक अळींचा प्रादुर्भाव झाला आहे. तुरीवरसुद्धा मररोगाचे आक्रमण झाले असल्याचे अहवालात नमूद आहे..काढणीवर असलेल्या मूग व उडदाचे उत्पादन पावसामुळे घटण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसामुळे परिपक्व अवस्थेतील या पिकांच्या शेंगा खराब होऊ लागल्या आहेत. मका वाढीच्या अवस्थेत असून त्यावर लष्करी अळीने आक्रमण केले आहे, तर ज्वारीची वाढ पावसाने खुंटली असून भात पिकाचीही हीच स्थिती आहे..Rain Crop Damage: पावसाने सोयाबीन, कापूस पिकांची हानी.कृषी विभागाने रोगग्रस्त भागांची पाहणी सुरू केली असून शेतकऱ्यांना प्रतिबंधक उपाययोजना सुचविल्या आहेत. मात्र पिकांवर रोगांच्या आक्रमणाची स्थिती बघता यंदाच्या खरिपात सरासरी उत्पादनात घट येण्याची शक्यता वाढली आहे..येलो मोझॅक ः अमरावती व मोर्शीकापूस मर रोग ः अमरावती, अचलपूर, तिवसा, नांदगाव खंडेश्वर, भातकुली, चांदूररेल्वे, दर्यापूर, वरुडतूर ः मर रोगाचा प्रादुर्भावज्वारी, भात ः पावसाने वाढ खुंटलीमका ः लष्करी अळीचा प्रादुर्भावपिकांची सद्यःस्थितीसोयाबीन (हेक्टर) ः हुमणी अळीचा प्रादुर्भाव ः तिवसा ः २३०, अंजनगावसुर्जी ः १९३, अमरावती ः ३७२, धामणगावरेल्वे ः ५००,चक्रीभुंगा ः तिवसा, दर्यापूर, धामणगावरेल्वे, भातकुली, चांदूररेल्वे, चांदूरबाजार, मोर्शी, नांदगाव खंडेश्वर, धारणी व वरुड .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.