Farmer Benefits: खरीप हंगामासाठी शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांकरिता विविध योजना राबविण्यात येत आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधणे महत्त्वाचे आहे..कडधान्य आत्मनिर्भरता अभियानसमाविष्ट पिके : तूर, उडीद, मसूर, मूग इत्यादी.योजनेचा उद्देश :तूर, उडीद आणि मसूर या पिकांवर विशेष लक्ष देऊन कडधान्यांचे उत्पादन वाढविणे.हवामानाला अनुरूप आणि सुधारित बियाणे शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात उपलब्ध करून देणे..Agriculture Schemes: कृषी योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा : पालकमंत्री प्रताप सरनाईक .कडधान्य लागवडीचे क्षेत्र वाढविणे.काढणीनंतर साठवणूक व व्यवस्थापनाच्या नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार करून त्याचा वापर वाढविणे.कडधान्यांमधील प्रथिने प्रमाण वाढविण्यास प्रोत्साहन देणे..योजनेची व्याप्ती :पीक आणि प्रस्तावित जिल्हेतूर ः सर्व ३४ जिल्हेउडीद : पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ..मसूर : पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.मूग : नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ.राजमा, मटकी, वाल, चवळी : सर्व ३४ जिल्हे.राबविण्यात येणारे प्रमुख घटक :पीक प्रात्यक्षिके.प्रमाणित बियाणे उत्पादनासाठी आर्थिक साह्य.प्रमाणित बियाणे वितरण.शेतकरी प्रशिक्षण.पैदासकार बियाणे खरेदीसाठी अर्थसाह्य.काढणीपश्चात प्रक्रिया व पॅकेजिंग युनिट्स.राष्ट्रीय खाद्यतेल अभियान : तेलबियायामध्ये मोहरी, भुईमूग आणि सोयाबीनवर प्राथमिक लक्ष केंद्रित करून तेलबिया पिकांच्या उत्पादनास चालना देण्यासाठी आणि दुय्यम तेलबिया आणि वृक्षजन्य तेलबिया सह इतर तेलबिया पिकांवर अभियानात भर देण्यात आला आहे. ‘दुय्यम भाजीपाला तेल उपभियान’ देखील राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अभियानाचा असून, यामुळे कापूस बियाणे, तांदूळ कोंडा आणि वृक्षजन्य तेलबिया सारख्या दुय्यम स्रोतांपासून प्रामुख्याने तेल काढणे या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. सदर अभियानांतर्गत सोयाबीन, भुईमूग, करडई, मोहरी, कारळे, सूर्यफूल व तीळ या पिकांसाठी महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांची निवड केली आहे. अभियानाची अंमलबजावणी मूल्यसाखळी समूह पद्धतीने केली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक समूहासाठी मूल्यसाखळी भागीदार म्हणून शेतकरी उत्पादक कंपनी/सहकारी संस्था/सार्वजनिक किंवा खासगी संस्थेची निवड करावयाची आहे. जिल्हास्तरावर मूल्यसाखळी भागीदार यांची निवड जिल्हा कार्यकारी समितीने करावयाची आहे..उद्दिष्टेखाद्यतेलांच्या आयातीवरील भारताचे अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत तेलबियांचे उत्पादन वाढवून आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारून आत्मनिर्भरतेकडे जाण्यासाठी धोरणात्मकरीत्या तयार केले गेले आहे. तेलबिया पिकांमधील उत्पन्नातील तफावत (६० टक्के) कमी करून शाश्वत वाढ करणे हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब : उत्पादनातील तफावत दूर करण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या आणि वापरात येणाऱ्या नवकल्पनांचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करणे.सुधारित बियाणे प्रसाराला गती : निवडलेल्या क्लस्टर्समध्ये सुधारित बियाणे वाणांचा (गेल्या पाच वर्षांत प्रसारित) आणि तंत्रज्ञानाचा प्रसार करणे..विस्तार : पडीक क्षेत्रावर तेलबिया लागवडीस प्रोत्साहन देणे आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून आंतरपिकांना प्रोत्साहन देणे.सुधारित बियाण्यांची उपलब्धता : दर्जेदार बियाण्यांची उपलब्धता होण्यासाठी बियाणे उत्पादन आणि वितरण प्रणालीतील त्रुटी दूर करणे.विपणन व्यवस्थेशी जोडणी : तेलबिया शेतकरी आणि मूल्यसाखळी भागीदार यांना विपणन व्यवस्था व प्रक्रिया उद्योगाशी जोडणे.दुय्यम तेलबियांपासून तेलनिर्मिती व संकलनास साह्य ः विशेषतः दुय्यम तेलबिया आणि वृक्षज तेलबिया (वृक्षजन्य तेलबिया) यांचे उत्पादन वाढवणे..समाविष्ट घटकबियाणे घटक (१०० टक्के केंद्र हिस्सा) : मूलभूत (पैदासकार) बियाणे खरेदी अनुदान.सीड हब निर्मिती (१०० टक्के केंद्र हिस्सा).मूल्यसाखळी समूह ः मूल्यसाखळी समूहामध्ये मूल्यसाखळी भागीदार निवडून समूहातील शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी प्रशिक्षण, समूहाबाहेरील शेतकऱ्यांना शेतीशाळा, मूल्यसाखळी भागीदार व्यवस्थापन साह्य, समूहातील शेतकऱ्यांसाठी माती आरोग्य चाचणी व कृषी मॅपर साह्य..तंत्रज्ञान प्रसारण : पीक प्रात्यक्षिके, माती आरोग्य चाचणी व कृषी मॅपर सहाय्य.काढणी पश्चात पायाभूत सुविधा: तेल काढणी युनिट (१० टन क्षमता) तसेच प्रमुख आणि दुय्यम तेलबिया प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामग्री आणि उपकरणे. प्रक्रिया भागीदारांना संकलन, वाहतूक, तेल काढणे, तेलाचा उतारा वाढण्याच्या कार्यक्षमतेसाठी यंत्र सामग्री आणि उपकरणे.फ्लेक्झी फंड घटकाअंतर्गत जिल्हा, विभाग स्तरीय कार्यशाळा व गोदाम उभारणी साह्य..अभियान व्यवस्थापन व संकीर्ण खर्च.पीक आणि जिल्हेभुईमूग : नाशिक, धुळे, जळगाव, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव, अकोला, गडचिरोलीकारळा : नाशिक, अहिल्यानगरतीळ : जळगाव, लातूर, बीड, बुलढाणा, वर्धा.Agriculture Subsidy: कोल्हापूर जिल्ह्यातील १३१ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; फलोत्पादन अभियानांतर्गत ६०.८१ लाखांचे अनुदान मंजूर!.सोयाबीन : लातूर, बुलढाणा, नांदेड, वाशीम, बीड, यवतमाळ, धाराशिव, परभणी, हिंगोली, अकोला, जालना, नागपूर, वर्धा, अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, सातारा, सांगली सोलापूर, कोल्हापूर, नंदुरबार, पुणे, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर.सूर्यफूल : धाराशिव, सोलापूर, जळगाव, लातूर, अहिल्यानगर, सांगली, नांदेड, पुणे.कृषी उन्नती योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान अंतर्गत बियाणे घटक योजना.उपघटकाचे नाव ः बियाण्यांच्या नवीन जातींना प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसाह्यअ) पायाभूत बियाण्यांवर अर्थसाह्यब) प्रमाणीकरण शुल्कावरील अर्थसाह्य.योजनेचा उद्देशबियाणे बदल दर व वाण बदल दरात वृद्धी करणे.कृषी विद्यापीठे, संशोधन संस्थांनी विकसित केलेल्या उच्च उत्पादक, पोषणदृष्ट्या समृद्ध व हवामान प्रतिरोधक नव्या वाणांचा प्रसारजुन्या वाणांचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करणे व नव्या वाणांचा बियाणे साखळीत समावेश करणे..योजनेचे स्वरूप व पात्रतेचे निकषएका बीजोत्पादक शेतकऱ्यास, संस्थेस जास्तीत जास्त ५ हेक्टर क्षेत्रापर्यंत तूर, मूग, उडीद,ज्वारी या पिकांचे संकरित किंवा सुधारित परंतु अधिसूचित केलेल्या बियाण्यांसाठी जास्तीत जास्त ५० टक्के अनुदानित दराने पायाभूत बियाणे पुरवठा करण्यात येईल.राष्ट्रीय बीज निगम यांच्या माध्यमातून बीजोत्पादक शेतकरी किंवा संस्थांनी भरलेल्या बीज प्रमाणीकरण शुल्काच्या ५० टक्क्यांपर्यंत अर्थसाह्य अनुज्ञेय राहील..पात्रतेचे निकषतूर, मूग, उडीद,ज्वारी या पिकांचे संकरित किंवा सुधारित परंतु अधिसूचित केलेले पायाभूत बियाणे अनुज्ञेय राहील.पायाभूत बियाण्यांच्या वितरणावर ५० टक्के अर्थसाह्य अनुज्ञेय राहील.८ वर्षे किंवा ८ वर्षांच्या आतील अधिसूचित पायाभूत बियाणे अनुदानासाठी पात्र राहील.प्रति बीजोत्पादक शेतकरी ५ हेक्टर क्षेत्र मर्यादेत लाभ अनुज्ञेय राहील.पायाभूत बियाणे। किंवा पायाभूत बियाणे-॥ वितरणासाठी सदर अर्थसाह्य केवळ एकदाच अनुज्ञेय राहील.पायाभूत ते प्रमाणित बियाणे उत्पादनाची संपूर्ण नोंद साथी पोर्टल वर करणे अनिवार्य राहील..अंमलबजावणी यंत्रणा : राष्ट्रीय बीज निगमअनुदान मापदंडअ) पायाभूत बियाण्यांवर अर्थसाह्य ःपिकाचे नाव आणि प्रमाणित बियाणे वितरणज्वारी : बियाणे रकमेच्या ५० टक्के किंवा रु. ३३०० प्रति क्विंटल यापैकी जी कमी असेल ती रक्कम.तूर, मूग, उडीद : बियाणे रकमेच्या ५० टक्के किंवा रु. ५५०० प्रति क्विंटल यापैकी जी कमी असेल ती रक्कम..ब) प्रमाणीकरण शुल्कावरील अर्थसाह्य :बीजोत्पादक शेतकरी किंवा संस्थांच्या स्वतःच्या शेतावर घेतलेल्या बियाणे उत्पादनासाठी बीज प्रमाणिकरण शुल्कावर कमाल ५० टक्के किंवा जास्तीत जास्त रु. ४०० प्रति हेक्टर (यापैकी जे कमी असेल) इतके अर्थसाह्य अनुज्ञेय राहील..राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान कापूस विकास कार्यक्रमविविध पीक पद्धतींचा अवलंब करून उत्पादन व शाश्वत उत्पादकता वाढविणे.जमिनीची सुपीकता व उत्पादकता वाढविणे.राज्यातील बियाणे क्षेत्रात पायाभूत सुविधांचा विकास करणे.कापूस पिकात कडधान्य आंतरपिकास प्रोत्साहन देणे.कापूस पिकात एकात्मिक कीड व्यवस्थापन, सरळ वाणांची अति घन लागवड, अधिक लांब धाग्याच्या कापसाच्या वाणांची प्रात्यक्षिके आयोजित करून कापूस उत्पादनास चालना..मनुष्यबळ विकासासाठी राज्यस्तरीय प्रशिक्षण.कापूस पिकाच्या अवशेषाचे व्यवस्थापन करून कीड व रोग आटोक्यात आणणे.समाविष्ट जिल्हे :धुळे, नंदूरबार, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.