Nashik News: नाशिक जिल्ह्यात दसऱ्याच्या मुहूर्ताला नवीन खरीप लाल कांद्याची आवक सुरू होत असते. मात्र यंदाच्या अतिवृष्टीने नवीन खरीप कांद्याचे अतोनात नुकसान झाल्याने बाजार आवारांमध्ये आवक कमी झाली. मागील वर्षीच्या तुलनेत आवक व दरदेखील कमी निघाले. जिल्ह्यात सरासरी १५०० ते १७०० रुपयांपर्यंत नवीन कांद्याला मुहूर्ताचे दर मिळाले. तर खारीफाटा (ता. देवळा) येथील श्री रामेश्वर कृषी मार्केटमध्ये ५५५५ रुपयांची उच्चांकी बोली लागली..जिल्ह्याच्या पूर्व भागातील मालेगाव, देवळा, चांदवड व नांदगाव या तालुक्यांत कांदा लागवडी टप्प्याटप्प्याने पूर्ण झाल्या. मात्र ऐन काढणीच्या अवस्थेत लागवडीचे नुकसान आहे. त्यामुळे आवकेवर परिणाम आहे. खारीफाटा (ता. देवळा) येथील रामेश्वर कृषी मार्केटमध्ये आवक टिकून राहिली..Onion Farming: साताऱ्यात पावसाची कांदा रोपे निर्मितीत अडचण .मात्र दरात अपेक्षित वाढ नव्हती. येथे २५ वाहनांतून १३८० क्विंटल आवक झाली. त्यास किमान १३००, कमाल ५५५५, तर सरासरी ४००० रुपये दर मिळाला. या वेळी रामेश्वर कृषी मार्केटचे अध्यक्ष पंकज ओस्तवाल, श्रीपाल ओस्तवाल आदींसह व्यापारी व बाजार समिती संचालक कर्मचारी उपस्थित होते..उमराणे (ता. देवळा) येथील स्व. निवृत्ती काका देवरे बाजार समितीमध्ये यंदा मुहूर्ताला कांद्याची आवक कमी होती. येथे १५ ते २० वाहनांतून १२०० क्विंटल आवक झाली. मागील वर्षीच्या तुलनेत ६०० क्विंटलने कमी होती. तर सरासरी दरसुद्धा २३०० रुपयांनी कमी होते..Kharif Onion Crops Damage : अतिवृष्टीचा खरीप, लेट खरीप कांद्याला फटका, ८० टक्के पिकाचे नुकसान.मालेगाव बाजार समितीच्या मुंगसे उपबाजारात कांदा आवक कमी झाली. मागील वर्षी येथे ८०० क्विंटल आवक होती. यंदा ती ७० क्विंटल झाली. मागील वर्षीच्या तुलनेत सरासरी दर येथे २७०० रुपयांनी कमी होते. मनमाड बाजार समितीमध्ये मागील वर्षी ४०० क्विंटल आवक झाली होती ही आवक यंदा अवघी ३० क्विंटल होती. सरासरी दर येथे क्विंटलमागे २००० रुपयांनी कमी निघाले..जिल्ह्यातील आवक (क्विंटल) व दर (रुपये) स्थिती (गुरुवारी, ता. २)बाजार समिती आवक किमान कमाल सरासरीश्री. रामेश्वर मार्केट (खारीफाटा) १,३८० १,३०० ५,५५५ ४,०००उमराणे १,२०० १,३५० ५,१०० १,७००मुंगसे ७१ ६०० ४,१४१ १,२००मनमाड ३० ६०१ २,००१ १,०००.उत्पादन व दरामुळे शेतकऱ्यांची दुहेरी कोंडीअतिवृष्टीमुळे गेल्या १५ दिवसांत नवीन खरीप कांद्याचे नुकसान आहे. परिणामी, जिल्ह्यातील विविध कांदा बाजार आवारात मुहूर्ताला आवक कमी आहे. प्रामुख्याने मालेगाव, चांदवड, देवळा व नांदगाव तालुक्यांत ही स्थिती आहे. त्यामुळे एकीकडे उत्पादनात घट झाली, तर दुसरीकडे दरातही फटका असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी वाढली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.