Jalna News: सततच्या पावसाने मंठा तालुक्यातील खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचा लागवडीचा व मशागतीचाही खर्च न निघाल्यामुळे अनेकांनी सोयाबीन, कापूस या उभ्या पिकांवर रोटाव्हेटर फिरविला. खासगी व राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्जाचा डोंगर शेतकऱ्यांच्या डोक्यावर वाढला आहे. एवढेच नव्हे तर यावर्षी शेतकऱ्यांना दिवाळीसुद्धा अल्प खर्चात साजरी करावी लागली. तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. खरीप हातातून गेल्यानंतर आता शेतकऱ्यांची आशा रब्बी हंगामावर आहे..यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने खरिपातील सोयाबीन गेले, तसेच कापसावर मोठ्या प्रमाणात लाल्या रोग आला. पाऊस उशिरापर्यंत पडल्याने ढगाळ वातावरण व पावसामुळे तूर पिकावरही मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झाला. यामुळे यावर्षी शेतकऱ्यांसाठी शेती व्यवसाय नुकसानीचा ठरला आहे..Kharif Crop Loss: खरिपाची कसर रब्बीत भरून काढू!.कोणते पीक घ्यावे म्हणजे शेती फायद्याची राहील, हे शेतकऱ्यांना सुचेनासे झाले आहे. खरीप हातातून गेल्यानंतर रब्बीची पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला होता. मात्र, शेतकऱ्यांनी पुन्हा कर्ज काढून व घरातील दागिने गहाण ठेवून कशीबशी रब्बीची पेरणी केली. निसर्गाने साथ दिल्यास रब्बी हंगामात तरी चांगले उत्पादन होईल, अशी आशा असलेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण भिस्तच आता रब्बी पिकांवर आहे..Kharif Crop Loss: तीन जिल्ह्यांत पीक कापणी प्रयोग अंतिम टप्प्याकडे.मंगळवारपर्यंत झाली ९३ टक्के पेरणीमंठा तालुक्याचे सरासरी क्षेत्र २६०५०.७१ हेक्टर असून, मंगळवारपर्यंत २४२५२ हेक्टर क्षेत्रात ९३.१० टक्के पेरणी झाली आहे.शाळू ज्वारीचे सरासरी १२३०८.४३ हेक्टर क्षेत्र असून, शाळू ज्वारीची पेरणी सहा हजार ७१० हेक्टर क्षेत्रात ५४.५२ टक्के झाली आहे. शाळू ज्वारीचे जवळपास पन्नास टक्के क्षेत्र घटले आहे..गहू पिकाचे सरासरी क्षेत्र ४१५९.५० हेक्टर असून, गव्हाची सहा हजार ११० हेक्टर क्षेत्रात १४६.८९ टक्के पेरणी झाली आहे. हरभरा पिकाचे सरासरी क्षेत्र ८५५८.७३ हेक्टर असून, आतापर्यंत ११ हजार २४० हेक्टर क्षेत्रात हरभऱ्याची १३१.३३ टक्के पेरणी झाली आहे. हरभरा पिकाचीदेखील पेरणी सुरू आहे..अनुदानासाठी शेतकऱ्यांच्या बँकेत चकराखरिपात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने अनुदान जाहीर केले होते. मात्र, हे अनुदान अल्प प्रमाणात असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. काही शेतकऱ्यांना खात्यात अनुदानाची रक्कम जमा झाली असून, काहींच्या खात्यात अद्याप अनुदानाची रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे शासनाने जाहीर केलेले अनुदान त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे. शेतकऱ्यांना या रकमेचा फायदा रब्बी हंगामासाठी होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.