Amaravati News : खरीप हंगामात आतापर्यंत झालेल्या पावसाने अमरावती विभागातील ३ लाख ३९ हजार ५०० हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला आहे. याबरोबरच १ हजार ८७ हेक्टर जमीन खरडून गेली असून ५ हजार ७३४ हेक्टर जमिनीवर गाळ साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. .१ जून ते १८ ऑगस्ट, या कालावधीत अमरावती विभागात अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत १०४ टक्के पाऊस झाला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका बुलडाणा जिल्ह्यातील सहा तालुक्यांना बसला असून ७८ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली आहे. .Rain Crop Damage: मराठवाड्यात ३ लाख ५८ हजार हेक्टरवरील पिकांना फटका.४ हजार १६६ हेक्टरमध्ये गाळ साचला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ९० हजार व वाशीम जिल्ह्यातील जवळपास ९८ हजार हेक्टरमधील पिके बाधित झाली आहेत..Rain Crop Damage: नुकसान आणखी वाढणार; शेतकऱ्यांची मदतीची मागणी .२६ जणांचा मृत्यूपावसाबरोबरच वीज पडून इतर घटनांमध्ये विभागात २६ जणांना जीव गमवावा लागला. सर्वाधिक ११ जणांचा मृत्यू यवतमाळ जिल्ह्यात झाला असून बुलडाण्यात आठ जणांचा जीव गेला आहे. अमरावती दोन, अकोला तीन व वाशीम जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यातील सोळा जणांच्या कुटुंबांना ६४ लाखांची मदत देण्यात आली आहे..जिल्हानिहाय नुकसान (हेक्टर क्षेत्र)अमरावती १२३६०अकोला ५९२८९यवतमाळ ९०९२४बुलडाणा ७८५७४वाशीम ९८३५३एकूण ३,३९,५००.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.