खरीप पिकांखालील एकूण क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत ६.५१ लाख हेक्टरने वाढ यंदा खरीप पीक क्षेत्र १,१२१.४६ लाख हेक्टरवर भात, मका, ऊस आणि कडधान्यासारख्या प्रमुख पीक क्षेत्रात वाढकाही भागात अतिवृष्टीने शेतपिकांचे मोठे नुकसान.Kharif Crops: केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत शेती क्षेत्राच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. यावेळी खरीप पिकांची स्थिती, रब्बी हंगामातील पेरणीची तयारी, पूरग्रस्त भागातील पीक परिस्थिती कशी आहे?, खतांची उपलब्धता, त्यांच्या किमती आणि देशभरातील प्रमुख धरणातील पाणीसाठा याची माहिती घेण्यात आली..अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खरीप पिकांखालील एकूण क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत ६.५१ लाख हेक्टरने वाढ झाली आहे. यंदा खरीप पीक क्षेत्र १,१२१.४६ लाख हेक्टरवर आहे. गेल्या वर्षी ते १,११४.९५ लाख हेक्टरवर होते. मुख्यतः गहू, भात, मका, ऊस आणि कडधान्यासारख्या प्रमुख पीक क्षेत्रात वाढ झाली आहे. उडीद पीक लागवडीखालील क्षेत्र गेल्या वर्षीच्या २२.८७ लाख हेक्टरवरून या खरीप हंगामात २४.३७ लाख हेक्टरपर्यंत पोहोचले आहे..Kharif Chilli Crop : खरिपातील मिरची उत्पादन घटणार, शेतकरी मका, कापूस पिकाकडे वळले.यावेळी मंत्री चौहान यांनी, देशातील पूरग्रस्त राज्यांतील पीक परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांना बैठकीत माहिती देण्यात आली की काही भागात अतिवृष्टीने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. तर अन्य ठिकाणी चांगल्या पावसामुळे पिकांची वाढ चांगली झाली आहे. यामुळे रब्बी पेरणी क्षेत्र आणि एकूण शेतमाल उत्पादनात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली..या बैठकीत फळपिके क्षेत्रात लक्षणीय वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले. २०२४-२५ मध्ये कांदा पीक ३.९१ लाख हेक्टरवर विस्तारले आहे. गेल्या वर्षी ते ३.६२ लाख हेक्टरवर होते. तर बटाटा लागवड क्षेत्र ०.३५ लाख हेक्टवरून ०.४३ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. याच कालावधीत टोमॅटो पीक क्षेत्र १.८६ लाख हेक्टरवरून २.३७ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. .Kharif Onion Crops Damage : अतिवृष्टीचा खरीप, लेट खरीप कांद्याला फटका, ८० टक्के पिकाचे नुकसान.मुबलक पाणीसाठासध्याचा तांदूळ आणि गव्हाचा साठाही अधिक असल्याचे अधिकाऱ्यांनी चौहान यांना सांगितले. विविध ठिकाणच्या धरणांतील पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या १६१ प्रमुख धरणांमध्ये दहा वर्षांच्या सरासरीच्या ११५ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी पाणीसाठा १०३ टक्के होता. या समाधानकारक पाणीसाठ्यामुळे येत्या हंगामात अधिक उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे..रब्बी हंगामासाठी खतांचा वेळेवर पुरवठा करण्याचे निर्देश रब्बी हंगामासाठी खतांचा वेळेवर पुरवठा व्हावा यासाठी रसायने आणि खते मंत्रालयाशी समन्वय साधावा. जेणेकरुन शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, असे निर्देश चौहान यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.