Kharif Season: खानदेशात खरीप हंगामातील पीक कर्जवाटपाला आता गती मिळाली आहे. जुलैच्या सुरुवातीला पीक कर्जवाटप ६० टक्क्यांपर्यंतही झाले नव्हते. मात्र, मागील ३० ते ४० दिवसांत कर्जवाटपात मोठी वाढ झाली असून, सध्या वाटपाची टक्केवारी सुमारे ७९ टक्क्यांवर पोहोचली आहे..यंदा खरीप हंगामात पीक कर्जवाटप ९० टक्क्यांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. खानदेशात खरीप हंगामासाठी सुमारे चार हजार कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट आहे. जूनपासून खरीप हंगामाला सुरुवात झाली असली, तरी सुरुवातीच्या काळात पीक कर्जवाटपाची गती संथ होती..Crop Loan Distribution: पीककर्ज वाटपात बँकांचा हात आखडता.विशेषतः राष्ट्रीयीकृत बँकांकडून पीक कर्जवाटपाबाबत हात आखडता घेतला जात असल्याच्या तक्रारी होत्या. नवीन पीक कर्जासाठी प्रस्ताव घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक बँक शाखांत अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची स्थिती होती. कर्मचारीसंख्या कमी असणे, शाखाधिकारी किंवा व्यवस्थापक उपलब्ध नसणे, तसेच नवीन बँक खाते उघडण्यात येणाऱ्या अडचणींमुळे कर्ज प्रस्ताव प्रलंबित राहत होते. मात्र, मागील महिन्यात परिस्थितीत सुधारणा झाली असून, सात हजारांहून अधिक पीक कर्ज प्रस्ताव मार्गी लागल्याची माहिती आहे..Crop Loan Distribution: पीककर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँका पिछाडीवर.जळगावात सर्वाधिक कर्जवाटपाचे उद्दिष्टखानदेशात जळगाव जिल्ह्यासाठी सुमारे २,८०० कोटी रुपये, धुळ्यासाठी ५०० कोटी रुपये आणि नंदुरबार जिल्ह्यासाठी ७०० कोटी रुपयांचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. गेल्या वर्षी हंगामअखेरीस केवळ ७५ टक्के पीक कर्जवाटप झाले होते. शासन व प्रशासनाकडून पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट निश्चित केले जाते; मात्र, त्यासाठी आवश्यक निधीची व्यवस्था बँकांना करावी लागते. त्यामुळे काही भागांत बँकांकडून मनमानी होत असल्याच्या तक्रारीही आहेत. .सध्या जळगाव जिल्ह्यात सुमारे ७६ टक्के पीक कर्जवाटप झाले आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतही प्रत्येकी सुमारे ४८० कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुरुवातीपासूनच पीक कर्जवाटपात आघाडीवर आहे. धुळे आणि जळगाव जिल्हा बँकांनीही यंदा उद्दिष्टाच्या तुलनेत अधिक पीक कर्जवाटप केले आहे. जळगाव जिल्हा बँकेने यंदा एक लाख सभासद शेतकऱ्यांना सुमारे एक हजार कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.