Kharif crop loan distribution 2026 Maharashtra: एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा संपला, पण अजूनही अनेक राष्ट्रीयीकृत बँकांनी खरिपासाठी पीककर्ज वितरण सुरू केलेले नाही. पीककर्जफेड केलेल्या सभासदांना नवीन पीककर्जाची प्रतीक्षा लागली असून बँका व विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमध्ये सध्या कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे. .दरवर्षी बँका व विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या कर्ज धोरण आणि तांत्रिक समितीच्या मंजुरीनुसार एप्रिलपासून पीककर्ज वितरण करत असतात. बँकांनी पीककर्ज मर्यादा निश्चित केली आहे. पण अनेक सभासदांना अजूनही पीककर्ज मिळालेले नसल्याची माहिती मिळाली..Crop Loan Distribution Issues: कर्जमाफीच्या घोषणेमुळे नवीन पीक कर्जवाटप रखडले.पीककर्ज मर्यादेत जिरायती कापूस पिकासाठी हेक्टरी ४४ हजार तर बागायती कापूस पिकास ५० हजार ६०० रुपये पीककर्ज दिले जाईल. ऊस पिकासाठी (आडसाली, पूर्वहंगामी, सुरू व खोडवा) ८८ हजार रुपये प्रति हेक्टरी कर्ज मर्यादा आहे. केळीसाठी हेक्टरी एक लाख चार हजार पाचशे रुपये पीककर्ज दिले जाईल. मका पिकासंबंधी ३२ हजार ७५०, बाजरीस २५ हजार, ज्वारीसाठी ३० हजार रुपये प्रतिहेक्टरी यानुसार पीक कर्ज दिले जाईल. तीळ पिकासाठी २७ हजार ५०० रुपये पीककर्ज दर निश्चित केला आहे. काही भागात कर्ज वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. पण काही भागात पीककर्जाची प्रतीक्षा आहे..Crop Loan Distribution Issues: कर्जमाफीच्या घोषणेमुळे नवीन पीक कर्जवाटप रखडले.गावनिहाय कर्ज वाटप कोटीच्या घरातजिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका व विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या मदतीने एका गावात सुमारे पाच कोटी रुपये पीक कर्ज वाटप होते. काही सोसायट्या यापेक्षा अधिकचे कर्ज वितरित करतात. जिल्ह्यात भादली (ता.जळगाव), भडगाव, कासोदा आदी अनेक मोठ्या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या अनेक वर्षे कार्यरत आहेत..राष्ट्रीयीकृत बँकांत विलंबराष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खरिपासंबंधीचे पीक कर्ज प्रस्ताव स्वीकारले जात आहेत. परंतु ते मार्गी लागत नसल्याची स्थिती आहे. प्रस्तावासोबत शेतीचे मूल्यपत्र, दोन लाख रुपयांवर कर्ज असल्यास रजिस्ट्रारकडे नोंदणीदस्त व अन्य कार्यवाही करावी लागत आहे. ही प्रक्रिया बँका १० ते १२ दिवसातही पूर्ण करीत नसल्याची स्थिती आहे. मागील खरिपात व सरत्या रब्बीतही पीक कर्ज वितरणाचा लक्ष्यांक पूर्ण झाला नाही. अशात या खरिपात बँकांनी पीक कर्ज वितरण गतीने करावे, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.