Farmers Insurance: खरीप पीकविम्यासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देऊनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून पीकविमा योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. जिल्ह्यातील २४ हजार ५१८ शेतकऱ्यांनी केवळ ४ हजार ४२३.७१ हेक्टर भात क्षेत्राचा विमा उतरविला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भात लागवड क्षेत्रापैकी केवळ ८ टक्के क्षेत्र विमासंरक्षित झाले आहे..जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्रावर भातपिकाची लागवड केली जाते. जिल्ह्यात या वर्षी कृषी विभागाने ५५ हजार हेक्टरवर भात लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले होते. आतापर्यंत जिल्ह्यात ४८ हजार ३९१ हेक्टरवर भात लागवड पूर्ण झाली आहे..Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण.यंदाचे वर्ष ‘एल निनो’चे वर्ष जाहीर करण्यात आले असून, त्याचा प्रभावदेखील सुरुवातीपासून जिल्ह्यात जाणवू लागला आहे. दक्षिण कोकणातील सर्वच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने हंगामाच्या सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांनी अधिकाधिक क्षेत्र विमासंरक्षित करावे, यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी गावागावांत विशेष मोहीमही राबविण्यात आली. शासनाने पीकविम्यासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. मात्र, तरीदेखील पीकविमा योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही..Crop Insurance 2026: पीकविम्याला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद.जिल्ह्यातील २४ हजार ५१८ शेतकऱ्यांनी ४ हजार ४२३.७१ हेक्टर क्षेत्र विमासंरक्षित केले आहे. भात लागवडीच्या एकूण क्षेत्रापैकी केवळ ८ टक्के क्षेत्र विमासंरक्षित झाल्याने जिल्हा कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न अपुरे ठरले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पीकविमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आणि विमासंरक्षित क्षेत्रात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ८ हजार ८६५ शेतकऱ्यांनी १ हजार ६९४.४६ हेक्टर क्षेत्र विमासंरक्षित केले होते. यावर्षी भातपिकासाठी हेक्टरी ६५० रुपये, तर नाचणी पिकासाठी ४०० रुपये विमा हप्ता निश्चित करण्यात आला होता..एल निनोच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने पीकविमा योजनेचा गावागावांत जाऊन प्रचार-प्रसार केला. लागवड क्षेत्र विमासंरक्षित करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचे काम कृषी सहायक आणि कृषी सेवकांनी केले. परंतु तरीदेखील अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.- उमाकांत पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी, कणकवली.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.