Farmer Welfare Scheme: यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेसाठी ६७ लाखांहून अधिक अर्ज भरले आहेत, अशी माहिती कृषी विभागाने दिली. सरकारने विमा अर्ज भरण्याची मुदत वाढविल्यानंतर अर्जांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे..पीकविमा योजनेतील भरपाईचे महत्त्वाचे ‘ट्रिगर’ काढल्यानंतर शेतकऱ्यांना गेल्या वर्षापासून तुलनेने कमी भरपाई मिळत आहे. त्यामुळे यंदाही पीकविमा योजनेला सुरुवातीला संथ प्रतिसाद मिळाला. प्रारंभी विमा अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै होती..या मुदतीपर्यंत गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास निम्मेच अर्ज प्राप्त झाले होते. त्यामुळे सरकारने अर्ज भरण्याची मुदत १० ऑगस्टपर्यंत वाढवली. वाढीव मुदतीत अर्जांची संख्या झपाट्याने वाढत असून, ४ ऑगस्टपर्यंत ६७ लाख अर्ज दाखल झाले आहेत. यंदा गेल्या वर्षापेक्षा अधिक विमा अर्ज प्राप्त होतील, असा विश्वास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला..Kharif Crop Insurance: अकोला जिल्ह्यात ९८ हजार हेक्टर पिकांचा उतरविला विमा.खरिपातील भरपाईचे १७९६ कोटी खात्यातगेल्या खरीप हंगामातील पीकविमा भरपाईची रक्कम १९४५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यापैकी १७९६ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून, उर्वरित १४९ कोटी रुपये पुढील काही दिवसांत जमा केले जातील, अशी माहिती कृषी विभागाने दिली..पाच जिल्ह्यांमध्येच ८७ टक्के भरपाईपीकविमा भरपाईच्या जिल्हानिहाय आकडेवारीनुसार, एकूण भरपाईपैकी तब्बल ८७ टक्के भरपाई केवळ पाच जिल्ह्यांमध्ये निश्चित झाली आहे. खरीप २०२५ मध्ये ३३ जिल्ह्यांमध्ये भरपाई निश्चित झाली..Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज.त्यापैकी नांदेड, हिंगोली, परभणी,धाराशिव आणि अहिल्यानगर या पाच जिल्ह्यांमध्येच १६९७ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे. उर्वरित २८ जिल्ह्यांसाठी केवळ २४८ कोटी रुपयांची भरपाई निश्चित झाली आहे..फळपीक विम्यातही अर्ज वाढलेपुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेलाही यंदा शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मृग बहरासाठी मागील वर्षी ५२ हजार विमा अर्ज प्राप्त झाले होते. यंदा आतापर्यंत ८५ हजार अर्ज दाखल झाले असून, अर्जांच्या संख्येत तब्बल ६३ टक्क्यांनी वाढ झाली आहे..सर्वाधिक भरपाई मिळालेले जिल्हेनांदेड ९६७ कोटीधाराशिव ३१५ कोटीपरभणी १४७ कोटीअहिल्यानगर १४० कोटीहिंगोली १२८ कोटी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.