Farming Tips & Crop Guidance: खरीप भात पूर्व मशागत आणि रोपवाटिका पूर्वतयारी करावी.भात लागवडीसाठी जमिनीची नांगरट करून जमीन उन्हात तापू द्यावी. यामुळे तण व किडींचे नियंत्रण होण्यास मदत होते.भात रोपवाटिका तयार करण्यासाठी जमिनीची चांगली नांगरट करून ढेकळे फोडावीत. जमिनीत प्रति गुंठा १०० किलो शेणखत मिसळावे. जमिनीचा उतार व निचरा लक्षात घेऊन उंच व चांगला निचरा होणाऱ्या ठिकाणी तळाशी १२० सेंमी, पृष्ठभागी ९० सेंमी रुंदीचे तसेच १०-१५ सेंमी उंचीचे गादीवाफे तयार करावेत. गादीवाफ्यांची लांबी जमिनीच्या उतारानुसार ठेवावी..खरीप लागवडीसाठी आवश्यक त्या योग्य जातींच्या दर्जेदार भात बियाण्यांची उपलब्धता करून घ्यावी. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकण विभागात लागवडीसाठी योग्य भात जातींची शिफारस केली आहे..Crop Advisory: कृषी सल्ला : राहूरी विभाग.कालावधी दाण्याचा प्रकार शिफारशीत जातीहळव्या जाती जाड रत्नागिरी-१, कर्जत-३मध्यम बारीक रत्नागिरी-२४, कर्जत-७अति बारीक कर्जत-४निमगरव्या जाती जाड रत्नागिरी-७ (लाल भात), कर्जत-५, कर्जत शताब्दीमध्यम बारीक रत्नागिरी-८, रत्नागिरी-६, कर्जत-६, कर्जत-९, ट्रॉम्बे कर्जत कोलम, कोकण संजय, पालघर-१, पालघर-२गरव्या जाती मध्यम बारीक कर्जत-२खार जमिनीसाठी निमगरवा, लांबट बारीक दाणा ट्रॉम्बे कोकण खारा.Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग.आंबानवीन लागवडीची पूर्वतयारी करावी.नवीन आंबा लागवडीसाठी १ बाय १ बाय १ मीटर आकाराचे खड्डे खणावेत. हे खड्डे चांगली माती, ३ ते ४ घमेली कंपोस्ट किंवा शेणखत आणि ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने भरावेत.लागवडीसाठी कलमांची आगाऊ मागणी करून उपलब्धता करावी.पावसाला सुरुवात होताच हापूस, रत्ना, सिंधू, केसर, पायरी, कोकण रुची, सुवर्णा, कोकण राजा, कोकण सम्राट, ऑस्टीन व लिली या शिफारस केलेल्या जातींची निरोगी कलमे लावावीत..नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना पहिली तीन वर्षे पाणी देण्याची व्यवस्था करावी. तसेच जोडाच्या खाली बुंध्यावर येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी. पहिल्या वर्षी आठवड्यातून दोनदा तर दुसऱ्या वर्षी पंधरा दिवसातून दोनदा व तिसऱ्या वर्षी महिन्यातून दोनदा प्रत्येक कलमांना ३० लिटर पाणी देण्याची व्यवस्था करावी. तसेच कलमाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे.- डॉ. वैभव राजेमहाडीक, ९४२०६७३२६७- डॉ. यशपाल चव्हाण, ८१४९४६७४०१(कृषिविद्या विभाग आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.