Hingoli News : खरिप २०२५ मधील अंतिम पेरणी क्षेत्राच्या आकडेवारीनुसार हिंगोली जिल्ह्यात ३ लाख ३९ हजार २०४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. खरिप २०२४ मधील ३ लाख ५४ हजार ४८५ हेक्टरच्या तुलनेत यंदा खरिपाच्या पेरणीत १५ हजार हेक्टरने घट झाली आहे. यंदा जिल्ह्यतील सोयाबीन, मूग, उडिद, ज्वारीच्या पेरणीत घट तर कपाशी, तुरीच्या पेरणीत वाढ झाली आहे..हिंगोली जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र ३ लाख ५३ हजार ९४९ हेक्टर आहे.त्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र २ लाख ४८ हजार ६५५ हेक्टर असतांना प्रत्यक्षात २ लाख ५७ हजार ९८३ हेक्टरवर (१०३.७५ टक्के) पेरणी असून गतवर्षीच्या तुलनेत २२ हजार ७४६ हेक्टरने घट झाली. .UP Kharif Sowing: उत्तर प्रदेशात यावर्षीच्या खरीप हंगामात बंपर पीक उत्पादन अपेक्षित.कपाशीची ४० हजार ३५७ हेक्टर पैकी ३७ हजार २५९ हेक्टरवर (९२.३२ टक्के) लागवड झाली असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा कपाशीच्या लागवडीत ६ हजार २६२ हेक्टरने वाढ झाली आहे. तुरीची ४४ हजार ३७८ पैकी ३३ हजार ९०९ हेक्टर (७६.३९ टक्के) पेरणी झाली असून तुरीच्या पेरणीत यंदा २ हजार ९०५ हेक्टरने वाढ झाली आहे. .Kharif Sowing : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यांतील ९२ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीविना .मुगाची ७ हजार ७८० पैकी ४ हजार ३१६ हेक्टर (५५.४८ टक्के) पेरणी झाली असून यंदा मुगाच्या पेरणीत ९७७ हेक्टरने घट झाली आहे. उडदाची ३ हजार २६२ हेक्टरपेरणी झाली असून यंदा उडदाच्या पेरणीत ६४३ हेक्टरने घट झाली आहे. .ज्वारीची १ हजार ८८६ हेक्टर पेरणी असून यंदा ३५६ हेक्टरने घट झाली आहे. यंदा जिल्ह्यातील हळदीच्या क्षेत्रात वाढ झाल्यामुळे खरिपाच्या क्षेत्रात घट झाली असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.हिंगोली जिल्हा २०२५ खरिपतालुकानिहाय पेरणी स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)तालुका पेरणी क्षेत्रहिंगोली ७४७७७कळमनुरी ६६१२४वसमत ६३६४९औंढा नागनाथ ५७९५५सेनगाव ८५४०६.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.