Rainfall Deficit: खानदेशात सध्या उन्हाचा कडाका वाढला आहे. पाऊस कमी झाल्याने बागायती रब्बी पिकांच्या पेरणीला यंदा मर्यादा येण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामातील गव्हाची पेरणी खानदेशात सुमारे २० ते २१ हजार हेक्टरवर होण्याचे संकेत आहेत..दुष्काळामुळे खरीप हंगाम हातचा गेल्यानंतर आता रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. साधारणतः १५ डिसेंबरपर्यंत गव्हाची पेरणी केली जाते. यंदा मात्र जलसाठे मुबलक नसल्याने गव्हाची पेरणी काहीशी कमी राहण्याची शक्यता आहे. मागील वर्षी गव्हाचे दर समाधानकारक राहिल्याने काही शेतकरी कमी पाणी आणि कमी खर्चात येणाऱ्या पिकांना पसंती देण्याचे नियोजन करीत आहेत..Wheat Sowing: अमरावतीच्या शेतकऱ्यांची यंदा गव्हाला अधिक पसंती .जळगाव जिल्ह्यात सुमारे १२ ते १४ हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी होण्याची शक्यता आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत मिळून सहा ते सात हजार हेक्टरवर पेरणी होईल. जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, भडगाव; धुळे जिल्ह्यात शिरपूर; तर नंदुरबार जिल्ह्यात शहादा, तळोदा या तालुक्यांत गव्हाची पेरणी अधिक होण्याची शक्यता आहे..Wheat Sowing: खपली गहू पेरणी खानदेशात अल्प.पेरणीसाठी शेतकरी संकरित तसेच घरात साठवून ठेवलेल्या बियाण्यांचा वापर करण्याची शक्यता आहे. बियाण्यावरील खर्च कमी केल्यास उत्पादन खर्चात बचत होऊन नफा वाढविता येतो, असे शेतकऱ्यांचे नियोजन आहे..काळ्या कसदार जमिनीत पेरणीचे नियोजनतापी, गिरणा, पांझरा, अनेर आदी नद्यांच्या क्षेत्रात गव्हाची पेरणी अधिक होण्याची शक्यता आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने पुढील काळात थंडी वाढेल की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. सध्या उष्णता कायम असून, पुढील महिन्यात गव्हाच्या पेरणीला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. बागायती कापूस, जुनारी किंवा काढणी पूर्ण झालेल्या केळी तसेच सोयाबीन आदी पिकांखालील क्षेत्र रिकामे झाल्यानंतर तेथे गव्हाची पेरणी केली जाणार आहे. खानदेशात रब्बी पिकांमध्ये गव्हाचे क्षेत्र तुलनेने कमी असते. त्यापेक्षा हरभऱ्याची पेरणी अधिक केली जाते. कमी पाणी आणि कमी खर्चात येणारे तसेच चांगले बेवड देणारे पीक म्हणून खानदेशात हरभऱ्याला शेतकऱ्यांची पसंती असते..कापूस क्षेत्र रिकामे झाल्यानंतरही पेरणीखानदेशात यंदा बहुतांश शेतकरी कापूस पिकाखालील क्षेत्र रिकामे झाल्यानंतर गव्हाची पेरणी करणार आहेत. बागायती किंवा पूर्वहंगामी कापूस पिकाची वेचणी नोव्हेंबरअखेरपर्यंत सुरू असते. त्यामुळे कापूस काढून क्षेत्र रिकामे करण्यास विलंब होणार आहे. काही शेतकऱ्यांनी डिसेंबरअखेरपर्यंत गव्हाच्या पेरणीचे नियोजन केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.