Summer Water Crisis: खानदेशात उष्णता वाढली आहे. शेतीसह ग्रामीण भाग, शहरांत पाण्याचा वापर, गरज वाढली असून, जलसाठ्यावर त्याचा ताण पडत आहे. खानदेशातील जलसाठा ५३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. .जळगाव जिल्ह्यात चाळीसगावलगतच्या गिरणा नदीवरील गिरणा धरणाचा मोठा लाभ आहे. या धरणातून दोन वेळेस नदीत आवर्तन सोडण्यात आले. त्यात यंदा १०० टक्के जलसाठा होता. हे धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिकमधील नांदगाव तालुक्यात आहे. पण नाशिकपेक्षा अधिकचा लाभ या धरणाद्वारे जळगाव जिल्ह्यास आहे. यातून जळगावमधील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, धरणगाव, एरंडोल या तालुक्यांतील २१ हजार हेक्टरवरील रब्बीस पाणी देण्यात येत आहे. .Reservoir Water Level प्रकल्पांमध्ये पाणीसाठा मुबलक; पण सूक्ष्म नियोजन आवश्यक.तसेच मालेगाव औद्योगिक वसाहतीसह पाचोरा, चाळीसगाव, भडगाव शहरांसही गिरणा धरणाच्या पाण्यातून पाणीपुरवठा केला जात आहे. गिरणा धरणाची साठवणक्षमता १८ टीएमसी आहे. पण त्यातील जलसाठ्याचा वापर अधिकचा झाल्याने त्यात आजघडीला फक्त सुमारे ३९ टक्के जलसाठा आहे. त्यातून आणखी नदीत आवर्तन सोडले जाईल. यामुळे गिरणातील जलसाठा आणखी घटणार आहे. पुढे पाऊस लांबल्यास गिरणा धरणातील जलसाठा अत्यल्प राहील, असेही संकेत आहेत..जळगाव जिल्ह्यात तापी नदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणातील जलसाठाही ५४ टक्क्यांपर्यंत आहे. यातूनही पाण्याची मोठी मागणी आहे. भुसावळ तालुक्यातील आयुध निर्माणी, दीपनगर औष्णिक वीज प्रकल्प, भुसावळ शहर, जळगाव औद्योगिक वसाहतीसह रावेर, यावल व चोपड्यातील रब्बीसाठी यातून पाणी दिले जात आहे. .Dam Water Level: राधानगरीसह काळम्मावाडी, तुळशी धरणांत पुरेसा साठा .हतनूर धरणही यंदा १०० टक्के भरले होते. त्यात ५० टक्क्यांवर गाळ आहे. यामुळे उपयुक्त जलसाठा कमी आहे. पुढेही हतनूर धरणातून पाण्याची मागणी कायम राहणार आहे. जामनेर (जि. जळगाव) तालुक्यातील वाघूर धरणातही जलसाठा ५७ टक्क्यांवर आहे. यातून जळगाव व जामनेर शहर, भुसावळ, जळगाव तालुक्यातील रब्बीस पाणी दिले जात आहे. तसेच उद्योगांनाही पाणी मिळत आहे. वाघूर धरणातही यंदा १०० टक्के जलसाठा होता..अनेक प्रकल्पांच्या साठ्यात घटजळगाव जिल्ह्यातील रावेरातील मंगरूळ, अभोडा, यावलधील सुकी, मोर, निंबादेवी, चोपड्यातील गूळ, जामनेरातील तोंडापूर, चाळीसगावातील मन्याड, पाचोरा-भडगाव भागातील बहुळा, अग्नावती तसेच बोरी, भोकरबारी, एरंडोलातील अंजनी या प्रकल्पांतील जलसाठाही ५७ टक्क्यांखाली आहे. धुळ्यातील अनेर, पांझरा, मालनगाव, अमरावती, सोनवद, बुराई या प्रकल्पांतील जलसाठ्यातही घट झाली आहे. नंदुरबारातील चिरडे, सुसरी, दरा, देहली या प्रकल्पांतील जलसाठाही ५६ टक्क्यांपर्यंत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.