Khandesh Crop Update: खानदेशातील पूर्वहंगामी, बागायती आणि कोरडवाहू तूर पिकाची वाढ समाधानकारक असून बहुतांश भागात पीक जोमात आहे. पीक संरक्षणासाठी शेतकरी अळीनाशके, बुरशीनाशके आणि कीटकनाशकांची फवारणी करत असून, फवारणीतून विद्राव्य खतांचाही वापर वाढला आहे..मागील हंगामात कमी पावसातही तूर पिकाने चांगले उत्पादन दिले आणि बाजारात समाधानकारक दर मिळाल्याने यंदा तूर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे यंदा तूर लागवडीत वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यात तूर लागवड सुमारे १३ हजार हेक्टरवर पोहोचली असून, अनेक शेतकऱ्यांनी तूर- सोयाबीन मिश्र पीक घेतले आहे..Tur Crop Pest Management: तूर पिकात शेंडा छाटणी, पक्षिथांबे उभारा : डॉ. गजानन लांडे .धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत मिळून सुमारे १६ हजार हेक्टरवर तूर लागवड झाल्याचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर आणि अमळनेर परिसरात तूर हे प्रमुख पीक म्हणून घेतले जात आहे. तर धुळे जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा, साक्री तसेच नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार आणि नवापूर तालुक्यांतही तुरीचे क्षेत्र लक्षणीय आहे..Tur Crop Management : तूरीमध्ये सिंचन, खत व्यवस्थापनावर भर.रावेर आणि मुक्ताईनगर परिसरात ठिबक सिंचनाच्या साह्याने जून महिन्यातच पूर्वहंगामी तुरीची लागवड करण्यात आली होती. या पिकाची वाढ सध्या चांगली असून, बैलांच्या साहाय्याने आंतरमशागत आणि तणनियंत्रणाची कामेही पूर्ण करण्यात आली आहेत..अधूनमधून पावसाची आवश्यकतासध्या कोरडवाहू भागातील तूर पीकही चांगल्या अवस्थेत असले तरी पुढील वाढीसाठी अधूनमधून पावसाची आवश्यकता असल्याचे शेतकरी सांगतात. अनेकांनी तुरीला दोन वेळा मूलखत (बेसल डोस) दिला आहे. उष्ण, ढगाळ आणि विषम हवामानामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने पीक संरक्षणासाठी फवारण्यांचे प्रमाण वाढले आहे. फवारणीद्वारे सूक्ष्म व विद्राव्य खतांचाही पुरवठा केला जात आहे..आवश्यकतेनुसार सिंचनमागील सात-आठ दिवसांपासून खानदेशात पाऊस नसल्याने फवारणीची कामे वेगाने पूर्ण करण्यात आली आहेत. हलक्या व मध्यम जमिनीतील तूर पिकाला आवश्यकतेनुसार सिंचनही केले जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.