Jalgaon News: खानदेशात उन्हाळ कलिंगडाची लागवड सुरू झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला लागवड केली आहे. यंदा नंदुरबारात लागवड कमी झाल्याची माहिती असून, खानदेशातील एकूण क्षेत्र १२०० ते १५०० हेक्टरवर राहील, असा अंदाज आहे. .खानदेशात उन्हाळ कलिंगडाची लागवड कमी केली जाते. जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुका कलिंगड लागवडीत आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ चोपडा, जळगाव, यावल, मुक्ताईनगर, नंदुरबारातील तळोदा, शहादा भागात कलिंगडाची लागवड केली जाते. कलिंगडास अखेरच्या १५ ते २० दिवसांत अधिकचे पाणी सिंचनासाठी लागते. अखेरच्या कालावधीत पिकास रोज पाच ते सहा तास सिंचन करावे लागते. पुढे काही भागातील शिवारात पाणीटंचाई तयार होवू शकते. तसेच रोगराईची भीती असते. पिकात यंदा नुकसान येत आहे. यामुळे कलिंगडाची लागवड यंदा कमी होईल, अशी स्थिती आहे. चोपडा, यावल भागात लागवड स्थिर राहणार आहे..Watermelon Cultivation: भरघोस उत्पादनासाठी कलिंगडाची लागवड कशी करावी?.जामनेरातील लागवडही स्थिर राहणार आहे. अनेक शेतकरी या महिन्याच्या मध्यात लागवड करतात. लागवडीसाठी काही शेतकरी रोपांचा उपयोग करीत आहेत. तर काही शेतकरी बियांची लागवड करीत आहेत. धुळ्यात धुळे, शिरपूर भागात काही शेतकरी लागवड करतात. धुळ्यातही क्षेत्रात मोठी घट किंवा वाढ झालेली नाही. ही लागवड पुढे आणखी १० ते १२ दिवस सुरू राहील. एप्रिल व मे महिन्यात काढणी होईल, या दृष्टीने सध्या लागवड सुरू आहे..Watermelon Cultivation: खानदेशात कलिंगड लागवड थांबली .नंदुरबारात मागील हंगामात ४०० हेक्टरवर उन्हाळ कलिंगडाची लागवड झाली होती. परंतु यंदा तेथील लागवड कमी होणार आहे. मागील हंगामात कलिंगडाचे नुकसान विषम वातावरणासह विविध रोगांमुळे झाले होते. दरही कमी होते. शेतकऱ्यांनी एकरी ६० ते ७० हजार रुपये खर्च केला होता. हा खर्चही अनेकांचा वाया गेला होता. कलिंगडाचे पीक नाजूक व अधिक श्रमाचे आहे. त्यात दैनंदिन विद्राव्य खते, आवश्यकतेनुसार एक दिवसाआड फवारणी घ्यावी लागते. यामुळे मोठे बागायतदार शेतकरी कलिंगड पिकापासून दूर आहेत. लहान, मध्यम शेतकऱ्यांनी आपल्याकडील जलसाठ्याच्या उपलब्धतेनुसार कलिंगडाची लागवड केली आहे..मजुरांची समस्याकलिंगड लागवडीसंबंधी देखील खानदेशात मजूरटंचाई जाणवत आहे. अनेक लहान शेतकरी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने लागवड उरकून घेत आहेत. एक दिवसात एका कुटुंबातील तीन सदस्य पाऊण एकरात पाच बाय दीड फूट अंतरातील लागवड पूर्ण करून घेत आहेत. कलिंगड लागवडदेखील किचकट, वेळखाऊ व अधिक श्रमाची प्रक्रिया आहे. यामुळे मजूर कलिंगड लागवडीसाठी येत नाहीत किंवा अधिकची मजुरी मागतात. यामुळे शेतकऱ्यांना कुटुंबीयांच्या मदतीने ही कार्यवाही करून घ्यावी लागत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.