Jalgaon News: खानदेशात यंदा ऊस गाळप मार्च महिन्यात १०० टक्के पूर्ण होत असते, परंतु गाळप यंदा उशिरा सुरू झाल्याने हंगाम महिनाभर लांबणार आहे. त्यामुळे एप्रिलअखेरीसही गाळप सुरूच राहणार असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत सुमारे नऊ लाख टनांवर गाळप पूर्ण झाल्याची माहिती आहे. .खानदेशात लहान-मोठे असे चार साखर कारखाने सुरू आहेत. त्यात नंदुरबारात तीन कारखाने आहेत. धुळ्यात एक लहान कारखाना किंवा गुऱ्हाळ सुरू असून, तेथेही रोज ६०० ते ७०० टन ऊस गाळप केले जात आहे. नंदुरबार जिल्ह्यात दोन खासगी व एक सहकारी साखर कारखाना सुरू आहे. .Sugarcane Crushing Season: उसाचे वजन कमी होऊन ‘दक्षिणा’ वाढू लागली.खानदेशात फक्त एकच सहकारी कारखाना नंदुरबारातील डोकारे (ता.नवापूर) येथे सुरू आहे. अन्य कारखाने खासगी व्यवस्थापनाचे आहेत. खानदेशात सर्वाधिक टन ऊस गाळप समशेरपूर (ता.नंदुरबार) येथील खासगी कारखान्याने केले आहे. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यातील चहार्डी (ता.चोपडा) येथील कारखान्याने ऊस गाळप केले आहे. गाळपास मागील महिन्यात गती आली आहे..Sugarcane Crushing Season: ऊस गाळपात सोलापूर जिल्ह्याचा राज्यात विक्रम.यंदा गाळप रखडतमागील आठवड्यापर्यंत एकूण नऊ लाख टनांवर गाळप झाले, तर अद्याप काही कारखान्यांचे सुरूच आहे. समशेरपूर येथील कारखान्याने यंदा १२ लाख टनांवर ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले होते. तसेच चोपडा व मुक्ताईनगर येथील कारखान्यांनीदेखील गाळपासंबंधी सुरवातीपासून गती दिली आहे. यंदा गाळप काहीसे उशिरा सुरू झाले. .परंतु त्यातील सातत्यामुळे ऊस तोडणी सुरूच आहे. गाळपही रखडत सुरू आहे. यामुळे गाळप एप्रिलमध्येही सुरू राहील, असे दिसते. नंदुरबारात नोव्हेंबरमध्ये अनेक मंडळांत अतिवृष्टी झाली होती. शहादा तालुक्यात अधिकचा पाऊस झाला होता. यामुळे या भागातील ऊस तोडणी अनेक दिवस बंद होती. डिसेंबरच्या मध्यानंतर तेथे ऊस तोडणी सुरू झाली. नंदुरबारात सर्वाधिक ऊस गाळप होत असल्याने या भागात तोडणी, वाहतूक वेगात सुरू आहे, अशी माहिती मिळाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.