Rabi Season: खानदेशात यंदा तेलबियांची पेरणी स्थिर राहण्याची शक्यता आहे. मात्र, तीळ पेरणी कमी होईल, असे चित्र आहे. भुईमूग आणि तीळ पिकांची पेरणी डिसेंबर व जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. खानदेशात रब्बी किंवा उन्हाळी हंगामात तेलबिया पिकांमध्ये भुईमूग आणि सूर्यफुलाचे क्षेत्र अधिक असते. तीळ पेरणी मात्र कमी असते. यंदा सूर्यफुलाची पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र, ती अपेक्षेइतकी झालेली नाही. या महिन्यातही काही शेतकऱ्यांनी सूर्यफुलाची पेरणी केली आहे..तीळ पेरणी सतत घटतेयतीळ पिकाची पेरणी यापुढे सुरू होणार असून, या महिन्यातही काही भागांत पेरणी केली जाईल. खानदेशात मागील १५ ते १८ वर्षांपासून तीळ पेरणीचे क्षेत्र सातत्याने कमी होत आहे. पूर्वी सात ते आठ हजार हेक्टरवर तीळ पिकाची पेरणी केली जात होती. खरिपाइतकीच पेरणी रब्बीतही शेतकरी करीत असत. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर, अमळनेर, पाचोरा, जामनेर हा भाग तीळ पिकासाठी प्रसिद्ध होता. धुळे जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा आणि नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, शहादा, नंदुरबार भागांतही शेतकरी तीळ पेरणीला पसंती देत असत. मात्र, कमी दर आणि अल्प उत्पादनामुळे पेरणीचे क्षेत्र कमी होत गेले..Maize Farming: पावसाअभावी मक्याचे क्षेत्र ८ हजार ६४४ हेक्टरने घटले.रब्बी किंवा उन्हाळी हंगामात सध्या सुमारे ४०० हेक्टरवर तीळ पीक घेतले जाते. केळी व अन्य पिकांसाठी बेवड मिळावा आणि पीक फेरपालट व्हावी, यासाठी काही शेतकरी तीळ पेरणी करतात. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदा, नंदुरबार, तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील काही भागांत तीळ पेरणी होणार आहे..Maize Cultivation: खानदेशात मका क्षेत्र पोहोचले एक लाख २० हजार हेक्टरवर.खरिपातही पेरणी कमीचखरिपात खानदेशात सुमारे १२०० हजार हेक्टरवर तीळ पेरणी अपेक्षित होती. मात्र, प्रत्यक्षात केवळ ३०० हेक्टरवरच पेरणी झाल्याची माहिती मिळाली. तीळचे दर स्थिर असून, चांगलेही आहेत. खरिपात कमी उत्पादन झाले. कमी पावसामुळेही पिकाचे नुकसान झाले. अनेक खरेदीदार आणि कारखानदारांना अन्य राज्यांतून तीळ मागवावी लागते. मागील वर्षभरापासून तीळचे दर प्रति क्विंटल १२ हजार रुपयांच्या खाली आलेले नाहीत..केळी, बागायती पिकांसाठी पूरककाळ्या कसदार जमिनीत भुईमूग आणि तीळ यांचे उत्पादन अधिक मिळते, असे शेतकरी मानतात. कमी खर्चात आणि कमी पाण्यात अशा जमिनीत भुईमूग व तीळ पिकांचे उत्पादन घेणे शक्य आहे. या जमिनीत केळी लागवडीपूर्वी भुईमूग किंवा तीळ पिकाचा बेवड असल्यास केळीचे पीक जोमदार येते, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.