Khandesh Keli Lagwad: खानदेशात आगाप कांदेबाग केळीची लागवड २० किंवा २२ ऑगस्टनंतर सुरू होणार आहे. यंदा कांदेबाग हंगामातील केळी लागवडीचे क्षेत्र काहीसे वाढेल, असे संकेत आहेत. कांदेबाग केळीची लागवड सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत केली जाते. त्यात आगाप लागवड ऑगस्टमध्ये, तर उशिराची लागवड डिसेंबरमध्ये केली जाते. .ही केळी श्रावणमास, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी या सण-उत्सवांच्या कालावधीत काढणीवर असतात. कांदेबाग हंगामातील केळीला मागील दोन वर्षांपासून चांगले दर मिळत आहेत. शिवाय या केळीवर करपा रोगाची समस्या कमी असते. मात्र, केळीच्या घडांवर पिटींग, काळे डाग आदी समस्या निर्माण होतात. त्यामुळे कांदेबाग हंगामातील केळी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे..Keli Kand Magani: खानदेशात केळी कंदांखाली क्षेत्र अधिक.लागवडीची तयारी पूर्णकांदेबाग केळी लागवडीची तयारी या आठवड्यात वेगाने झाली आहे. पाऊस नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी पूर्वमशागत व अन्य कामे करून घेतली आहेत. कांदेबाग केळी लागवडीसाठी कंदांचा अधिक वापर केला जातो. तसेच रोपांचा वापरही वाढला आहे. केळीच्या कंदांमध्ये वसई, ग्रॅण्ड नैन, आंबेमोहोर, महालक्ष्मी आदी वाणांना शेतकरी पसंती देतात. सध्या काढणी पूर्ण झालेल्या केळी बागांतील कंदांची विक्री या लागवडीसाठी सुरू आहे..Banana Production: कांदेबाग केळी उत्पादनात घट येणार.चोपडा, जळगाव, जामनेर भागात सप्टेंबरच्या मध्यावर कांदेबाग केळीची लागवड सुरू होईल, असे चित्र आहे. कारण अनेक शेतकऱ्यांनी केळीसाठी नियोजित क्षेत्रात मूग, उडीद, धैंचा आदी पिकांची लागवड केली आहे. पीक फेरपालट आणि जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी केळी उत्पादक ही पिके घेतात. ही पिके जमिनीत गाडल्यानंतर त्यात केळीची लागवड करण्याचा प्रघातही अनेक भागांत आहे. मूग, उडीद यांची कापणी अद्याप सुरू झालेली नाही..जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक लागवडकांदेबाग केळीची लागवड खानदेशात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक होते. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातही ही लागवड केली जाते. जळगाव जिल्ह्यात दरवर्षी १८ ते २० हजार हेक्टरवर कांदेबाग केळीचे पीक असते. धुळे जिल्ह्यातही सुमारे दोन ते तीन हजार हेक्टरवर कांदेबाग केळीची लागवड केली जाते..जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यात सर्वाधिक कांदेबाग केळी असते. त्यापाठोपाठ जामनेर, जळगाव, पाचोरा, भडगाव, यावल या भागांत कांदेबाग केळीची लागवड केली जाते. अलीकडे मुक्ताईनगर, रावेर या भागांतही कांदेबाग केळीची लागवड वाढली आहे. या भागात आगाप लागवडीचे प्रमाण अधिक आहे. या भागातील कांदेबाग किंवा आगाप कांदेबाग केळीखालील क्षेत्रही पाच हजार हेक्टरपेक्षा अधिक झाले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.