Jalgaon News: कमाल तापमान खानदेशात सातत्याने वाढत असून, उन्हाळा सुरू झाल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांपार असल्याने उन्हाचा चटका अधिक तापदायक होत असून, केळी, फळबागांचे सिंचन व उष्ण वाऱ्यांपासून पीक बचावासंबंधीची कार्यवाही शेतकरी काटेकोरपणे करून घेत आहेत..लहान पपई, केळी, कलिंगड पिकास उष्णतेचा फटका बसत आहे. कलिंगडाची फळे केळीची कोरडी पाने व अन्य सामग्रीने झाकून ठेवावी लागत आहेत. तसेच केळी व अन्य फळ बागांभोवती शेतकरी हिरवी नेट लावून उष्ण वाऱ्यांपासून पिकांचा बचाव करीत आहेत. मंगळवारी (ता.१०) कमाल तापमान ३९ अंश सेल्सीअस होते. .Khandesh Temperature Rise: खानदेशात उष्णता वाढू लागली; शेतीकामांच्या वेळेत होतोय बदल.बुधवारीदेखील (ता.११) सकाळपासून सूर्याचा पारा चढत होता. दिवसाच्या वेळेस हवेची कमाल गती तशी ३२ किलोमीटर प्रतितास होती. आकाश सकाळपासूनच निरभ्र होते. २० मार्चपर्यंत कमाल तापमान सरासरी ३९ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. किमान तापमान २० अंशांपेक्षा जास्त नसेल. आकाश निरभ्र राहील, असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे..Khandesh Temperature Rise: खानदेशात उष्णता वाढू लागली; शेतीकामांच्या वेळेत होतोय बदल.शेतीकामे सकाळीचशेतीकामे सकाळीच उरकून घेतली जात आहेत. कारण दुपारी उन्हाचा चटका वाढत आहे. पिकांची कापणी, मळणी आदी कामे सकाळी साडेसात किंवा आठ ते दुपारी दोनपर्यंत पूर्ण करून घेतली जात आहेत. तसेच केळी, कलिंगड, पपई काढणीची कामेही लवकर उरकून घेतली जात आहेत. वातावरणातील बदलामुळे आरोग्यावरही परिणाम जाणवू लागला आहे. .लहान मुले व वयोवृद्धांना उन्हाचा जास्त फटका बसला आहे. पारा वाढू लागताच ऊन लागण्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. तसेच नाकातून रक्त येणे, सर्दी-तापाच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेत अधिक पाणी पिणे, उन्हात गेल्यास डोक्याला रुमाल लावणे, आरोग्यदायी आहार घेणे आदी सल्ले डॉक्टर देत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.