Rain Deficit: खानदेशात यंदा पावसाने अद्याप समाधानकारक हजेरी लावलेली नसल्याने जून महिन्याची सरासरी गाठली जाईल का, याबाबत चिंता व्यक्त होत आहे. पूर्वमोसमी पाऊस जवळपास झाला नसून जून महिन्यातही पावसाचा अभाव कायम आहे. परिणामी १५ जूननंतर अपेक्षित वेगाने पेरण्या सुरू झालेल्या नाहीत..धुळे जिल्ह्याची वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५६५ मिलिमीटर, नंदुरबारची ८५४ मिलिमीटर तर जळगावची ६३२ मिलिमीटर आहे. जळगाव जिल्ह्यात केवळ जून महिन्यात सरासरी १२३ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र १७ जूनपर्यंत झालेला पाऊस या तुलनेत अत्यल्प असल्याने पर्जन्यमानात मोठी तूट दिसून येत आहे..Waiting For Rain: खानदेशात पेरण्यांना पावसाची प्रतीक्षा .चाळीसगाव, धरणगाव, पारोळा, बोदवड या भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. काही दिवसांपूर्वी यावल, रावेर आणि मुक्ताईनगर परिसरात वादळी पावसाच्या हलक्या सरी झाल्या होत्या. मात्र त्याचा पेरण्यांना अपेक्षित फायदा झालेला नाही..जळगाव जिल्ह्यातील आवर्षणप्रवण भागांमध्ये पावसाची कमतरता अधिक जाणवत आहे. पाचोरा, भडगाव, अमळनेर, तसेच धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, शहादा भागांतही पावसाची प्रतीक्षा कायम आहे..Waiting For Rain: गडगडाटच अधिक, पावसाचा केवळ शिडकावा.पावसाअभावी प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील जलसाठ्यात वाढ झालेली नाही. तापी नदीवरील हतनूर धरण आणि गिरणा धरणात अद्याप लक्षणीय पाण्याची आवक झालेली नाही. गतवर्षी जूनअखेरपर्यंत हतनूर धरणातून विसर्ग सुरू झाला होता, तर सापुतारा व नाशिक परिसरातील पावसामुळे गिरणा धरणातील जलसाठा वाढला होता. यंदा मात्र या दोन्ही प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रातही समाधानकारक पाऊस नसल्याने जलसाठ्यात वाढ झालेली नाही. धुळे जिल्ह्यातील काही भागांत हलका पाऊस झाला असला तरी त्यावर पेरण्यांना गती मिळालेली नाही..नद्यांना प्रवाही पाणी नाहीपावसाअभावी नाले आणि नद्यांना अद्याप प्रवाही पाणी आलेले नाही. तापी नदीवरील शेळगाव, सुलवाडे, सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला नाही. तसेच गिरणा, अनेर, पांझरा, अंजनी, वाघूर यांसह अन्य नद्यांमध्येही प्रवाह निर्माण झालेला नसून अनेक ठिकाणी नदीपात्रे कोरडी पडत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.