Rain Break: खानदेशात काही भागात पाऊसमान चांगले दिसत आहे. परंतु हलक्या, मुरमाड जमिनीच्या भागात पावसाची प्रतीक्षा किंवा गरज आहे. काळ्या कसदार जमिनीच्या भागात पावसाची उसंत असल्याने शेतीकामांनी जोर धरला आहे. .सततचा पाऊस या आठवड्याच्या सुरवातीपर्यंत होता. परंतु बुधवारपासून (ता.८) अनेक भागात पाऊस नाही. मंगळवारी (ता.७) पाचोरा, भडगाव, अमळनेरचा काही भाग, चाळीसगावच्या अनेक गावांत चांगला, अतिजोरदार पाऊस झाला होता. अन्य भागात तुरळक पाऊस झाला. तीन दिवस पाऊस नसल्याने शेतीकामांनी वेग घेतला आहे. कापूस, सोयाबीन, मका, उडीद, मूग, तूर आदी पिकांत कोळपणी, तणनियंत्रण आदी कामे सुरू आहेत..Kharif Season Preparation: खरीप हंगामासाठी गावोगावी तयारीला वेग.लहान केळी बागांसह पपई, उसातही तण वाढले होते. हे तण काढण्याचे काम प्राधान्याने सुरू आहे. कारण तणामुळे मुख्य पिकाच्या मुळा व तणाच्या मुळांची स्पर्धा होते व यात मुख्य पिकाच्या वाढीला फटका बसतो. मुख्य पिकास खतेही तण वाढल्याने दिली जात नव्हती. परंतु पावसाची उसंत मिळाल्याने आंतरमशागतीला वेग आला आहे. तण गतीने काढले जात असून, लागलीच बैलांकरवी आंतरमशागत केली जात आहे. यानंतर खते दिली जात आहेत..Agriculture Intercultivation : पावसाने उसंत घेतल्याने आंतरमशागतीस वेग.तणामुळे अनेक शेतकऱ्यांच्या एक महिन्याच्या पिकात एक वेळेसही खत देण्यात आले नव्हते. केळी पिकातही खते देण्यासह अन्य कामे ठप्प होती. परंतु मागील दोन दिवसात आंतरमशागतीला वेग आला आहे. मजुरांकरवी तणनियंत्रणाचे काम केले जात आहे. मागील दोन - तीन दिवसात जळगाव, चोपडा, धरणगाव व अन्य भागात जोरदार किंवा चांगला पाऊस झालेला नाही..मजूरटंचाई कायमखानदेशात मजूरटंचाई कायम आहे. आता एकाच वेळेस अनेक शेतकऱ्यांच्या शेतात तणनियंत्रण व अन्य कामे सुरू झाली आहेत. यामुळे मजुरांची गरजही अधिक आहे. पुढे पाऊस आल्यास तणनियंत्रणाचे काम ठप्प होईल, या भितीने शेतकरी कामे उकरून घेत असून, मजूरटंचाई तयार झाली आहे. यामुळे अन्य गावांतून मजूर आणावे लागत आहेत. मजुरी दर १८० ते २०० रुपये प्रतिरोज, असा दिला जात आहे. काहींनी मजूरटंचाईमुळे तणनाशकांचा उपयोग वाढविला आहे. तणनाशकांचे दरही वाढले आहेत. मका, सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, तूर या पिकांत तणनाशकांचा उपयोग अधिकचा होत आहे. यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.