Khandesh Agriculture Update: खानदेशात मेअखेर व जूनच्या सुरुवातीला लागवड झालेल्या पूर्वहंगामी (बागायती) कापूस पिकाची वाढ समाधानकारक आहे. मात्र सततचा पाऊस, वाफशाचा अभाव आणि मजूरटंचाईमुळे आंतरमशागत, तणनियंत्रण व इतर महत्त्वाची कामे रखडली आहेत..खानदेशात सुमारे सव्वालाख हेक्टर क्षेत्रावर पूर्वहंगामी कापसाची लागवड झाली आहे. हलक्या तसेच अधिक पाणी धारण करणाऱ्या जमिनीतील शेतांमध्ये तणाची वाढ मोठ्या प्रमाणावर झाली आहे. तणनियंत्रणासाठी जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत मजूरटंचाई जाणवत असून, मजुरी सुमारे २०० रुपये प्रतिदिन झाली आहे. एकाच वेळी सर्वत्र आंतरमशागत आणि तणनियंत्रणाची कामे सुरू असल्याने मजुरांची उपलब्धता कमी पडत आहे..Cotton Farming: पूर्वहंगामी कापूस पिकाला पाते-फुले .काळ्या कसदार जमिनीतील शेतांमध्ये वाफसा नसल्याने हाताने तण काढणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी तणनाशकांचा वापर करत आहेत. पूर्वहंगामी कापसाची उंची दोन ते तीन फूट झाली असून, ढगाळ वातावरणामुळे वाफसा लवकर होण्याची शक्यता कमी असल्याचे शेतकरी सांगत आहेत..Cotton Crop Growth: खानदेशात पूर्वहंगामी कापूस पीक जोमात.खतांची मागणी कायमहंगामाच्या सुरुवातीलाच युरियाचा तुटवडा जाणवला होता. अनावश्यक युरिया वापर टाळण्याचे आवाहन कृषी विभागाने केले असले, तरी पिकाच्या वाढीसाठी युरियाची मागणी कायम आहे. काही शेतकरी नॅनो युरियाचाही वापर करत आहेत. मात्र दाणेदार युरियाची उपलब्धता अद्यापही मर्यादित आहे. .याशिवाय डीएपी आणि १०:२६:२६ खतांनाही मोठी मागणी आहे. पावसानंतर शेतकरी पिकाला बेसल डोस देत असले, तरी खते सहज आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने अडचणी कायम आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.