Cotton Farmingखानदेशात मेअखेर व जूनच्या सुरुवातीला लागवड झालेल्या पूर्वहंगामी (बागायती) कापसाची वाढ समाधानकारक होत आहे. मात्र अनेक भागांत तणांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी आंतरमशागत आणि तणनियंत्रणाच्या कामांना वेग दिला आहे. मजूरटंचाईमुळे अनेक शेतकरी तणनाशकांचा वापर करून तणनियंत्रण करत आहेत..पावसापूर्वी आंतरमशागत पूर्ण करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला. अनेकांनी दोन फेऱ्यांची आंतरमशागत पूर्ण केली असून, पहिला रासायनिक खतांचा डोसही दिला आहे..Pre Season Cotton Cultivation: खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू .खानदेशात सुमारे सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावर पूर्वहंगामी कापसाची लागवड झाली आहे. हलक्या आणि अधिक पाणी वापराच्या जमिनीत तणांचे प्रमाण वाढले आहे. जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत तणनियंत्रणासाठी मजूरटंचाई जाणवत आहे. काही गावांत तण काढणीसाठी मजुरांनी प्रतिदिन दोन हजार रुपयांपर्यंत मजुरीची मागणी केल्याने अनेक शेतकऱ्यांनी तणनाशकांचा पर्याय स्वीकारला आहे..Kharif Season Preparation: खरीप हंगामासाठी गावोगावी तयारीला वेग.कापसाखालील क्षेत्र मोठे आणि उपलब्ध मजूर कमी असल्याने तणनाशकांचा वापर वाढत आहे. तणनियंत्रणासाठी प्रतिएकर सुमारे १,२०० रुपये खर्च येत आहे. काही कंपन्यांनी १५ दिवसांपासून एक महिन्यापर्यंतच्या कापूस पिकासाठी, तसेच दीड महिन्याच्या पिकासाठी प्रतिएकर ४०० ते ५०० रुपये खर्चाची तणनाशके बाजारात उपलब्ध केली आहेत. खर्च परवडणारा आणि परिणामकारक असल्याने शेतकरी त्यांचा वापर करतआहेत..युरियाची टंचाई कायमहंगामात खतांचा वापर सुरू होत असतानाच युरियाची टंचाई जाणवत आहे. कृषी विभागाकडून कमी प्रमाणात आणि गरजेनुसारच युरियाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अधिक युरिया वापरल्यास कापसात फुले व पातेगळ होण्याचा धोका वाढत असल्याने शेतकरीही संयमाने वापर करत आहेत. पहिला खतांचा डोस पूर्ण झाला असून, पीक सुमारे ६० दिवसांचे झाल्यानंतर दुसरा बेसल डोस देण्याचे नियोजन केले जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.