Kharif Cotton Cultivation: खानदेशात २२ मेपासून पूर्वहंगामी कापूस लागवडीला सुरुवात झाली असून काही भागांत बीजांकुरणदेखील झाले आहे..खानदेशात यंदा कापूस लागवड स्थिर राहण्याचा अंदाज असून, सुमारे आठ लाख हेक्टरवर लागवड होऊ शकते. कापूस हे खानदेशातील प्रमुख पीक असून खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्र कापसाखाली असते. यंदा पूर्वहंगामी कापूस लागवड सुमारे एक ते सव्वा लाख हेक्टरवर होण्याची शक्यता आहे. ही लागवड प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यात अधिक प्रमाणात होते..Khandesh Cotton Cultivation: खानदेशात कापूस लागवडीची तयारी.पूर्वी १५ मेपासून पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू केली जात होती. मात्र, मागील काही वर्षांपासून बियाणे पुरवठ्यातील अडचणी आणि काळाबाजारामुळे लागवड २० मेनंतर सुरू होऊ लागली आहे. यंदा २२ मेपासून खानदेशातील चोपडा, जळगाव, यावल, तसेच धुळे जिल्ह्यातील धुळे, शिंदखेडा आणि नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा भागांत पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू झाल्याची माहिती आहे. काही भागांत कापसाचे बीजांकुरणदेखील झाले आहे..यंदा जळगाव जिल्ह्यात सुमारे ४ लाख ८० हजार हेक्टरवर कापूस लागवड होण्याची शक्यता आहे. धुळे जिल्ह्यात सुमारे पावणेदोन लाख हेक्टर, तर नंदुरबार जिल्ह्यात ९० ते ९४ हजार हेक्टरवर लागवड होईल, असे संकेत आहेत. खानदेशात खरिपातील एकूण लागवड सुमारे १४ लाख हेक्टरवर असते. त्यापैकी एकट्या कापसाचे क्षेत्र आठ ते साडेआठ लाख हेक्टरपर्यंत असते..Cotton Cultivation: अकोल्यात कपाशीच्या लागवडीत वाढीची शक्यता.कृषी विभागाच्या आवाहनाला ‘खो’गुलाबी बोंडअळीचे चक्र नष्ट करण्यासाठी मे महिन्यात पूर्वहंगामी कापूस लागवड टाळून जूनमध्ये लागवड करावी, असे आवाहन कृषी विभागाने वारंवार केले होते. मात्र, शेतकऱ्यांनी या आवाहनाकडे दुर्लक्ष करत पूर्वहंगामी लागवडीचा मुहूर्त साधला आहे..मे महिन्यातील लागवड फायदेशीरमे महिन्यात कापूस लागवड केल्यास पुढे पोळा सणाच्या सुमारास कापूस वेचणीला येतो. दिवाळीपूर्वी तीन वेचण्या पूर्ण होतात. या वेचण्यांमधून मोठ्या प्रमाणात उत्पादन हाती येते. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये कापसाचे क्षेत्र रिकामे करून त्यात मका, गहू, हरभरा तसेच अन्य फळ व भाजीपाला पिकांची लागवड खानदेशातील शेतकरी करतात. त्यामुळे मे महिन्यातील कापूस लागवडीकडे अनेक शेतकऱ्यांचा कल कायम असल्याचे सांगण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.