Cotton Farming: खानदेशात जूनच्या सुरुवातीला व मेअखेरीस लागवड केलेल्या पूर्वहंगामी (बागायती) कापूस पिकाची वाढ जोमात आहे. पिकातील तणनियंत्रण, आंतरमशागत तसेच खतांची मात्रा देण्याची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, कोरडवाहू कापूस पिकाची स्थिती पावसाअभावी बिकट झाली आहे..खानदेशात यंदा कापसाखालील क्षेत्र कमी झाले असले, तरी अनेक शेतकऱ्यांनी परंपरेनुसार लागवड केली आहे. तापी, गिरणा, अनेर, पांझरा आदी नदीकाठच्या काळ्या कसदार जमिनीत कमी पाऊस असल्यास बागायती कापूस पीक अधिक जोमात येते, असा अनुभव शेतकऱ्यांना आहे. यंदा जून व जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली नसल्याने तसेच पिकात आंतरमशागत व तणनाशकांच्या फवारणीसाठी पुरेसा कालावधी मिळाल्याने व्यवस्थापन सुरळीत झाले आहे..Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू.यामुळे पिकात खतांचा वापर व अन्य व्यवस्थापनाची कामे वेळेत झाली असून अनेक ठिकाणी कापूस पीक दोन फुटांपर्यंत वाढले आहे. हलक्या व मध्यम जमिनीतील बागायती कापूस पीकही समाधानकारक स्थितीत आहे. विविध किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी दोन फवारण्या पूर्ण केल्या आहेत..Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू.दोनदा आंतरमशागतपिकात अनेक शेतकऱ्यांनी दोनदा आंतरमशागत पूर्ण केली आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन मध्यंतरी या कामांना वेग देण्यात आला. तसेच रासायनिक खतांचा पहिला डोसही देण्यात आला आहे. काळ्या कसदार जमिनीतील काही भागात कापूस पीक लवकरच फुलोरा अवस्थेत जाण्याची शक्यता असून जमिनीत सध्या चांगला वाफसा आहे..तणनाशकांच्या फवारणीमुळे तणांचा त्रास कमीजळगाव जिल्ह्यात काही गावांत तणनियंत्रणासाठी महिला व पुरुष मजुरांकडून दिवसाला २०० रुपये मजुरीची मागणी होत आहे. यंदा कापसाखालील क्षेत्र कमी असल्याने आणि तणनाशकांचा वापर वाढल्याने अनेक भागांत तणांची समस्या कमी झाली आहे. सध्या पाऊस नसल्यामुळे नवीन तणांची वाढही कमी असल्याचे दिसून येत आहे..बागायती कापसासाठी युरियाची मागणी कायमखतांचा वापर सुरू होताच युरियाची टंचाई जाणवत आहे. बागायती भागात कापूस पिकासाठी युरियाची मागणी अधिक असली, तरी पुरवठा अपुरा आहे. त्यामुळे अनेक शेतकरी ६० दिवसांनंतर दुसरा बेसल डोस देण्याचे नियोजन करत आहेत. पिकाची वाढ समाधानकारक असल्याने पुढील काळातही खतांची मागणी कायम राहण्याची शक्यता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.