Agricultural Market Committee: खानदेशात पपईदराचा तिढा तयार झाला आहे. खरेदीदार आवक कमी असूनही दर कमी देत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे वित्तीय नुकसान होत असून, पपईची काढणीदेखील रखडली आहे. न परवडणारे दर खरेदीदार देत आहेत. यात बाजार समित्या, शेतकरी व खरेदीदार यांची बैठक घेऊन योग्य दर शेतकऱ्यांना दिले जावेत, अशी मागणी केली जात आहे. .दर्जेदार पपई खानदेशात उपलब्ध आहे. उत्पादन मात्र कमी येत आहे. दुसरीकडे बाजारात आवक अल्प आहे. किरकोळ बाजारात पपईचे दर ५० ते ६० रुपये प्रतिकिलोपर्यंत किंवा काही भागात यापेक्षा अधिक आहेत. पण, शेतकऱ्यांना जागेवर १७ ते २२ रुपये प्रति किलोचा दर काही भागात मिळत आहे. नंदुरबारातही कमाल दर २१ रुपये प्रतिकिलो, असा आहे. धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा भागातही कमाल दर कमी मिळत आहे. .E-Pik Pahani Problem: पीक पेरा नोंदीअभावी अनेक जण केळी पीकविमा योजनेपासून दूर.नफेखोरी एजंट, खरेदीदार करीत आहेत. यावर प्रशासनाचे नियंत्रण नाही, असे पपई उत्पादकांचे म्हणणे आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, जळगाव आदी भागातही पपईचे दर १७ ते २२ रुपये प्रतिकिलो, असेच आहेत. अनेक खरेदीदार दर निश्चित करतात, पण खरेदीस येत नाहीत. दर व काढणीचा ठराव झाल्यानंतर पक्व झालेल्या १०० टक्के पपईची काढणी केली जात नाही, असे एका पपई उत्पादकाने सांगितले..Sugarcane Price Hike : ऊस उत्पादकांना प्रति टन ३०० वाढीव दर जाहीर करा.काढणी रखडततापी, अनेर पट्ट्यातील काही गावांत पपईचे सौदे खरेदीदारांनी केले. परंतु काढणीस टाळाटाळ करीत आहेत. मोठ्या बाजारांत दर कमी झाले, असे एजंट सांगत असून, दर पाडून नफेखोरी करीत आहेत, असा आरोप शेतकरी करीत आहेत. हा तिढा दिवसेंदिवस वाढत असून, शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. प्रशासनाने यासंबंधी तोडगा काढून कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत..ठळक बाबीथंडीच्या काळात पपईला मोठी मागणी असते, पण पपईची चांगल्या दरात शेतकऱ्यांकडून खरेदी सुरू नाहीकमी दरात पपई मिळावी यासाठी खरेदीदारांनी एकी करून दरकोंडी केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप किरकोळ बाजारात मात्र पपईला कमाल ६० रुपये प्रति किलोचा दर आहेकिरकोळ बाजारात अव्वाच्या सव्वादर आहे, दुसरीकडे शेतकऱ्यांना मात्र या दरांचा लाभ होताना दिसत नाही.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.