Farming Update: खानदेशात कांदा पीक काढणीवर आले आहे. अनेक भागात पुढील आठवड्यात काढणीस सुरूवात होईल, अशी स्थिती आहे. .काही भागात पिकाची स्थिती बरी आहे. परंतु ढगाळ व प्रतिकूल स्थितीने अनेक भागात पिकांस फटकाही बसला आहे. खानदेशात यंदा कांद्याची लागवड घटली आहे. सुमारे ४० हजार हेक्टरवर कांद्याची लागवड अपेक्षित होती. परंतु लागवड सुमारे पाच ते सहा टक्क्यांनी कमी झाली आहे. कारण दर अस्थिर राहील्याने सर्वत्र लागवड झाली नाही. .Onion Harvest: लेट खरीप कांदा काढणी सुरूच.जलसाठे पुरेसे आहेत. विहिरी, कूपनलिकांचे पाणी नंदुरबारातील नंदुरबार, नवापूर, शहाद्यातील काही भागासह धुळ्यातील धुळे, साक्री, शिंदखेडा, जळगावातील पारोळा, भडगाव, बोदवड आदी क्षेत्रात मुबलक आहे. पण बाजार अस्थिर असल्याने अनेकांनी लागवड टाळली आहे. तर काहींनी लागवड कमी केली आहे. कांद्याऐवजी चारा पिकांची त्यातही कमी पाण्यात व लवकर हाती येणाऱ्या चारा पिकांची पेरणी केली होती. यामुळे कांद्याची लागवड सर्वत्र कमी झाली आहे..Onion Farming: कांदारोप खरेदी-विक्रीवर मुल्हेर परिसरात भर .कांद्याचा खर्चही आता मजुरी व खतांचे दर वाढल्याने अधिक झाला आहे. यात काही शेतकऱ्यांनी पिकातून नफा मिळेल यातून लागवड केली आहे. जळगाव जिल्ह्यात यावल, चोपडा, चाळीसगाव, धरणगाव, एरंडोल या भागात कांदा पीक आहे. धुळ्यातील धुळे, साक्री भागातही लागवड झाली आहे. धुळ्यात सुमारे १९ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. नंदुरबारात नंदुरबार व नवापूर भागात कांदा पीक आहे..पीक पक्वतेच्या स्थितीतअनेकांनी जानेवारीच्या सुरवातीलाही लागवड केली. काही शेतकऱ्यांनी डिसेंबरच्या सुरवातीला लागवड केली आहे. पीक अडीच ते दीड महिन्याचे आहे. त्यात पक्वता येवू लागली आहे. परंतु जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात एेन वाढीच्या पीक विकासाच्या कालावधीत ढगाळ व विषम वातावरण होते. याचा फचका पिकास बसला आहे. अजूनही ढगाळ वातावरण आहे. पाऊस आल्यास पिकात हानी होवू शकते. पीक पक्व झाल्याने त्याची लागलीच काढणी केली जाईल. त्यामुळे नीरभ्र वातावरणाची गरज आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.