Sowing Delayed: खानदेशात तेलबियांची पेरणी स्थिर राहणार आहे. सणासुदीमुळे सूर्यफूल पेरणी रखडली आहे. भुईमूग पेरणी सातपुडालगत बऱ्यापैकी होईल, असे दिसत आहे. पण भुईमूग पेरणी काहीशी कमी राहू शकते, असाही अंदाज आहे. .खानदेशात भुईमुगाची पेरणी किंवा लागवड डिसेंबरमध्ये सुरू होईल. यंदा क्षेत्रात किंचित घट होईल, असे चित्र आहे. सूर्यफूल पेरणी पुढील आठवड्यातही होईल, असेही संकेत होते, पण सणासुदीमुळे अडचणी असल्याचे दिसत आहे..Oilseed Sowing: तेलबिया पेरणी स्थिर; सूर्यफूल पेरा रखडला.पेरा स्थिर राहणारमागील हंगामात खानदेशात सुमारे ९०० हेक्टरवर भुईमुगाची पेरणी झाली होती. यंदा ही पेरणी सुमारे ७५० ते ८०० हेक्टरवर होईल, असे संकेत आहेत. मागील वेळेस पाऊसमान बरे होते. जळगाव जिल्ह्यातील पश्चिम भागात गिरणा धरणातून रब्बीसाठी आवर्तन मिळाल्याने रब्बी चांगला होता. यंदाही अनेक सिंचन प्रकल्प १०० टक्के भरले. पण काही भागात टंचाई तयार होईल. कारण पाऊसमान कमी होते. सूर्यफुलासह भुईमुगाची पेरणी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, जामनेर, भडगाव, एरंडोल, धुळ्यातील साक्री, धुळे या भागात काहीशी कमी होईल. कारण या भागात जानेवारीतच टंचाईची समस्या तयार होवू शकते, अशी चिंता आहे..Delayed Rainfall: पाऊस लांबल्याने पीक नियोजनाची गरज.गिरणा पट्ट्यात पेराखानदेशात जळगावातील गिरणा पट्टा, धुळ्यातील शिरपूर, सातपुडा पर्वतालगतच्या भागात भुईमुगाची पेरणी होईल. तसेच सातपुड्यालगत जळगावातील यावल, चोपडा, नंदुरबारातील तळोदा भागात पेरणी स्थिर असणार आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सर्वाधिक पेरणी होईल, अशी माहिती आहे..आगाप लागवडी होणारआगाप भुईमुगाची पेरणी नोव्हेंबरच्या अखेरीस अनेकांनी करण्याचे नियोजन केले आहे. डिसेंबरमध्ये दुसऱ्या आठवड्यात भुईमूग पेरणीला वेग येवू शकतो. मागील वेळेसही डिसेंबरमध्ये भुईमूग पेरणी गतीने सुरू झाली होती. अनेकांनी पेरणी नोव्हेंबरअखेरीस तुषार सिंचनाच्या मदतीने करण्याचे नियोजन केले आहे. सर्वाधिक पेरणी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होईल. खानदेशात भुईमुगाची पेरणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केली जाते. शेतकरी कमी कालावधीत येणाऱ्या वाणांना पसंती देतील, असेही संकेत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.