Banana Cultivation Update: खानदेशात मृग बहरातील केळीची लागवड अद्याप सुरू असून, यंदा या हंगामातील लागवड ६० ते ६१ हजार हेक्टरपर्यंत पोहोचल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुरुवातीपासूनच केळीखालील क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. अर्ली (आगाप) लागवड मे महिन्यात, तर नियमित लागवड जून-जुलैमध्ये मोठ्या प्रमाणावर झाली असून, काही शेतकरी ऑगस्टमध्येही उशिराची लागवड करत आहेत..खानदेशात सर्वाधिक मृग बहर केळीचे क्षेत्र जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असून, तेथे सुमारे २८ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. यंदा उन्हाळ्यात केळीला समाधानकारक दर मिळाले. एप्रिल ते मेच्या मध्यापर्यंत दर्जेदार केळीला चांगली मागणी होती. जुलैमध्ये दरात आणखी सुधारणा झाली. मृग बहरातील केळीचे उत्पादनही समाधानकारक राहिले असून, जळगाव जिल्ह्यात मार्चअखेरीपासून काढणीला सुरुवात झाली..Banana Cultivation: खानदेशात आगाप कांदेबाग केळी लागवड सुरू.आगाप लागवडीचे प्रमाण अधिकमृग बहर केळीची लागवड साधारणपणे मे महिन्यापासून सुरू होते. आगाप (अर्ली) लागवड मेच्या दुसऱ्या आठवड्यात, तर नियमित लागवड जूनपासून केली जाते. खानदेशात मृग बहराखालील क्षेत्र कांदेबाग केळीपेक्षा अधिक आहे. यंदा आगाप लागवडीचे प्रमाणही वाढले आहे..Khanesh Banana Cultivation: मृग बहर केळी लागवड खानदेशात वाढण्याचे संकेत; क्षेत्र ८० हजार हेक्टरवर जाण्याची शक्यता.कांदेबाग केळीची लागवड प्रामुख्याने चोपडा, जळगाव, पाचोरा आणि जामनेर भागात होते. तर मृग बहर केळीचे क्षेत्र रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर तसेच नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा आणि शहादा भागात अधिक आहे. केळी लागवडीसाठी उतिसंवर्धित रोपांच्या वापराचे प्रमाणही वाढत आहे..काही भागांत मजूरटंचाईचा फटका रोपांच्या लागवडीसाठी चांगले नियोजन गरजेचे मृग बहरातील केळीची एकूण लागवड सुरूच अनेकांचे उशिरा लागवडीचे नियोजन कांदेबाग केळीची काढणी गणेशोत्सवापासून कांदेबाग केळीची काढणी गणेशोत्सव आणि दसऱ्याच्या सुमारास सुरू होते. .सध्या पिलबाग, नवती आणि मृग बहरातील केळीची काढणी यावल, रावेर, चोपडा, पाचोरा, भडगाव, जळगाव, जामनेर तसेच नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि शहादा भागात सुरू आहे. मागील महिन्यात या केळीला चांगला बाजारभाव मिळाल्याने उत्पादकांना दिलासा मिळाला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.