Khandesh Kharif Farming: खानदेशात खरीप हंगामात मका पिकाची लागवड यंदा वाढली आहे. पण पिकाच्या चांगल्या वाढीसाठी पुरेशा पावसाची गरज आहे. सुमारे पावणेदोन लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यात सुमारे सव्वा लाख हेक्टरवर मका पीक आहे. .धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, साक्री आणि नंदुरबारमधील नवापूर, तळोदा, शहादा भागांतही बऱ्यापैकी लागवड झाली आहे. मागील खरीप व रब्बी हंगामातही मका लागवड बऱ्यापैकी होती. कारण चारा व धान्यासाठी शेतकरी पिकाकडे वळले होते..Maize Export: मका निर्यातीत वाढ; भाव कमी असल्याने शेजारच्या देशांकडून मागणी.पिकात महाग बियाणे, मजुरी खर्च आणि लष्करी अळीसंबंधी प्रतिबंधात्मक उपाय यामुळे खर्च वाढला आहे. या हंगामात सध्याचे दर व विपणन व्यवस्था लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. परंतु पिकात लष्करी अळीचा प्रकोप येतच असतो. हा प्रकोप एक फवारणी घेऊनही थांबत नाही..Maize Cultivation Beneficial: मका लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर.एका फवारणीसाठी एकरी किमान १२०० ते १३०० रुपये खर्च येत आहे. तसेच मजुरी खर्चही लागतो. मागील कालावधीत मका पिकाची लष्करी अळीमुळे हानी झाली आहे. त्यात सुरुवातीलाच १५ ते २० टक्के नुकसान होत असते. फवारणी वेळेत न घेतल्यास नुकसानीची पातळीही वाढते. फवारणीत कीडनाशके किंवा अळीनाशकांसह संप्रेरके, अन्नद्रव्येदेखील फवारावी लागतात. कारण अळीमुळे पिकाची वाढ कमी होते..अळीची समस्या सर्वत्रजळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा, यावल, रावेर, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, धरणगाव, एरंडोल भागांत मका पीक आहे. या भागात सर्वत्र अळीचा प्रकोप वेळीच दूर करण्यासाठी यंदा उपाययोजना करण्याची गरज आहे. काही मका वाण अळीला प्रतिकारक्षम असल्याची बतावणी बियाणे विक्रेते व इतर प्रतिनिधी करतात. अशा स्थितीत कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्रांनी देखील आपली जबाबदारी तत्परतेने पार पाडण्याची गरज असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.