Low Rainfall Issue: खानदेशात पाऊसमान कमी; सिंचन प्रकल्पांतील जलसाठाही मर्यादित
Monsoon Update: खानदेशात अद्याप जोरदार पावसाच्या सरी कोसळलेल्या नसल्याने पावसाचे वितरण असमान राहिले आहे. काही भागांत समाधानकारक पाऊस झाला असला, तरी अनेक तालुक्यांत अजूनही पावसाची तूट आहे. परिणामी, सिंचन प्रकल्पांमधील जलसाठाही अपेक्षेप्रमाणे वाढलेला नाही.