Banana Farming: खानदेशात नियमीत कांदेबाग केळीची लागवड सप्टेंबरमध्ये गती होईल. त्यासाठी शेतकरी शेतांत सध्या पूर्वमशागत, मशागतीची कामे करून घेत आहेत. तसेच शेतकरी आपल्या जमिनीचे आरोग्य चांगले राहावे यासाठी शेतात माती, गाळ व शेणखताची भर करीत आहेत..शेणखत आता दुरापास्त झाले आहे. त्याचे दरही वधारत आहेत. एक ट्रॉली शेणखत २६०० ते २८०० रुपयांना मिळत आहे. तेदेखील गावानजीक किंवा गावात मिळत नाही. अन्य तालुके, गावांमधून शेणखत आणावे लागत आहे. केळी पट्ट्यात शेणखताची मागणी असते. खानदेशात धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील तळोदा, शहादा, जळगावातील चोपडा, यावल, जामनेर, रावेर, मुक्ताईनगर, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव या भागात शेणखताची मागणी असते. यात पशुधनाची संख्या कमी झाली आहे. यामुळे सर्वच शेतकऱ्यांकडे शेणखत उपलब्ध होत नाही. यामुळे शेतकऱ्यांना महागडे शेणखत घ्यावे लागत आहे..Natural Fodder Farming: ‘माफसू’चा नैसर्गिक चारा उत्पादन प्रयोग यशस्वी.पावसाने अडचण शक्यशेतात मशागत, शेणखत टाकण्याचे काम गतीने सुरू आहे. हे काम या महिन्यात अधिकचे वेगात सुरू असून, पाऊस सुरू झाल्यास त्यात काहीसा व्यत्ययही येईल. मातीची वाहतूक करता येणार नाही. पण शेतकरी शेणखत आणून त्याचा साठा शेतानजीक करून घेत आहेत..Banana Cultivation: खानदेशात मृग बहर केळी लागवडीस गती .गिरणाकाठी शेणखत मुबलकशेणखत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, चाळीसगाव, धरणगाव, अमळनेर, पारोळा, भडगाव या भागात उपलब्ध आहे. धुळ्यातील साक्री, धुळे भागातही शेणखत विक्रीस उपलब्ध असून, शेतकरी या भागातून त्याची खरेदी करीत आहेत. शेणखतावर उपाय म्हणून अनेक शेतकरी पिकांचे अवशेष जमिनीत गाडतात. .तसेच हिरवळीच्या खतांचा प्रयोग करतात. तसेच काळ्या कसदार जमिनीचा पोत सुधारावा यासाठी शेतकरी पांढरी, हलक्या क्षेत्रातील मातीची भर काळ्या कसदार जमिनीत करून घेत आहेत. या शेतांत पुढे हिरवळीचे पीक किंवा मूग, उडदाची पेरणी करून त्यात केळीचे उत्पादन घेण्याचे नियोजनही आहे. अनेकांनी मूग, उडीद पिकाचे अवशेष जमिनीत गाडण्याची तयारी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.