Kharif Season: खानदेशात पाऊसमान एकसमान नाही. अनेक भागांत पाऊस हुलकावणी देत आहे. तर काही भागांत चांगला पाऊस झाला आहे. .जळगाव जिल्ह्यात सुमारे ४० टक्के एवढी तूट जून महिन्यातील पावसासंबंधी आहे. जूनमध्ये जिल्ह्यात १२८ मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. पण काही भागात पाऊस अल्प, तर काही भागांत सरासरीएवढा पडला आहे. जळगाव जिल्ह्यात रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, बोदवड, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव भागात पाऊसमान बरे आहे. चाळीसगावातील काही महसूल मंडळांतही पावसाची तूट आहे. जळगाव, चोपडा, धरणगाव, एरंडोल, पारोळा आदी भागात पावसाची तूट मोठी आहे. सरासरी ४० टक्के पावसाची तूट आहे..Low Rainfall Issue: खानदेशात पाऊसमान कमी; सिंचन प्रकल्पांतील जलसाठाही मर्यादित.काही तालुक्यांत जूनमध्ये आतापर्यंत पाच ते सहा दिवस पाऊस पडला आहे. तर काही भागात आठ-नऊ दिवस पाऊस पडला आहे..Khandesh Rain Update: खानदेशात हलका, तुरळक पाऊस.रावेर, मुक्ताईनगरात अधिकचा पाऊस झाला आहे. धुळे व नंदुरबारातही असमान पाऊसमान आहे. तेथेही पावसाची ४० टक्के तूट आहे. अजूनही काही भागात पेरणीयोग्य पाऊस नाही. शेतकरी जोरदार पावसाची प्रतीक्षा करीत आहेत..जळगावात प्रथमच जोरदारजळगाव शहर व लगतच्या काही भागात सोमवारी (ता.२९) प्रथमच जोरदार पाऊस आला. दुपारी सुमारे अर्धा तास चांगला पाऊस झाला. ग्रामीण क्षेत्रातील आव्हाणे भागातही चांगला पाऊस झाला. पण अन्य भागात हलका पाऊस झाला. तसेच एरंडोल, धरणगाव भागातही पाऊस झाला. जून महिन्याच्या अखेरिस पाऊस सुरू झाल्याने पावसाची तूट कायम राहील, असे दिसत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.