Irrigation Projects : जळगाव खानदेशात यंदा पावसाचा जोर सध्या नाही. काही भागात मध्यम ते हलका पाऊस झाला. पाऊस नसल्याने विविध सिंचन प्रकल्पांतील आवकही अल्प किंवा शून्यावर आहे. .मागील वर्षी ऑगस्टमध्ये चांगला पाऊस होता. विविध सिंचन प्रकल्पांतील पाणी पातळी वाढली होती. तर काही सिंचन प्रकल्प या पावसात पूर्ण भरले. पण यंदा अजून अनेक प्रकल्प भरलेले नाहीत. चाळीसगावनजीकच्या गिरणा धरण लाभक्षेत्रातील पावसाने भरले आहे. आता अल्प आवक या धरणात सुरू आहे. गिरणा धरणाची साठवण क्षमता १८ टीएमसी आहे. .Khandesh Dams: खानदेशातील हतनूर, अनेरमधून विसर्ग.हे धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यातील नांदगावात आहे. परंतु नांदगाव व जळगावातील चाळीसगाव तालुक्याच्या सीमेवर हे धरण आहे. त्याचा लाभ जळगावला अधिक असून, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगावातील २१ हजार हेक्टरला लाभ होते. रब्बी हंगामास पाणी मिळते. तसेच नाशिकमधील मालेगाव औद्योगिक वसाहतीसह चाळीसगाव, पाचोरा, भडगाव शहर व अन्य १०० गावांच्या पाणी योजनांनाही गिरणा धरणातून पाणी दिले जाते..Khandesh Dam Water Storage: धरणांतील जलसाठा ३५ टक्क्यांवर.नाशिकमधील पावसाने धरणात जलसाठा सतत वाढला. परंतु त्यातील आवक आता कमी होत आहे. या धरणात नाशिकमधील ठेंगोडा बंधारा व हरणबारी, चणकापूर, केळझर, पुनद या प्रकल्पांतून पाण्याची आवक सुरू होती. आता फक्त अल्प आवक सुरू आहे. नाशिकमधील चांदवड, सटाणा, मालेगाव व नांदगाव या भागात जोरदार पाऊस झाल्यास गिरणा धरणातील आवकेत वाढ होईल, अशी माहिती मिळाली. जळगाव जिल्ह्यात एरंडोलातील अंजनी, पाचोऱ्यातील बहुळा, अग्नावती या प्रकल्पांतील जलसाठा अल्प आहे. जामनेरातील तोंडापूर, वाघूर धरणातही आवक नाही. धुळ्यातील अनेर, अमरावती, बुराई, सोनवद या प्रकल्पांत पाण्याची अत्यल्प आवक सुरू आहे. पावसाळ्याचे ७५ दिवस पूर्ण झाले आहेत. पुढील काळात पाऊस झाल्यास प्रकल्प भरतील..हतनूरमधून विसर्ग सुरूचतापी नदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे. परंतु त्यातून विसर्ग सुरूच आहे. जलसाठा नियंत्रणासाठी त्यातून विसर्ग केला जात आहे. नंदुरबारात गोमाई, सुसरी, रंगावली नदीतही प्रवाही पाणी कमी झाले आहे. जळगाव जिल्ह्यात अनेर, पांझरा नदीतही पाणी प्रवाह कमी झाला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.