Rainfall Deficit Impact: खानदेशात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने पशुपालक आणि शेतकऱ्यांमध्ये संभाव्य चाराटंचाईची चिंता वाढली आहे. माळरानांवर गवत उगवले नसल्याने चराईची व्यवस्था कोलमडली असून शेतकरी साठवून ठेवलेल्या कोरड्या चाऱ्याचा जपून वापर करीत आहेत..यंदा रब्बी हंगामातून गव्हाची काड, कुट्टी आणि इतर कोरडा चारा तुलनेने चांगल्या प्रमाणात उपलब्ध झाला होता. त्यामुळे अनेक पशुपालकांनी चाऱ्याचा साठा करून ठेवला आहे. मात्र, पावसाचा विलंब कायम राहिल्यास हा साठा किती काळ पुरेल, याबाबत चिंता व्यक्त होत आहे..Fodder Shortage: नांदेडमध्ये चारा टंचाईचे सावट.सध्या खानदेशातील कोरडवाहू भागात खरीप पेरण्या सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे ज्वारी, मका आणि इतर चारा पिकांपासून मिळणाऱ्या हिरव्या चाऱ्याची उपलब्धता अनिश्चित बनली आहे. सामान्यतः सप्टेंबरअखेरपासून खरीप पिकांमधून चारा उपलब्ध होण्यास सुरुवात होते. मात्र, पावसाचा खंड कायम राहिल्यास यंदा ही परिस्थिती बदलू शकते..Green Fodder Shortage: माळशिरसमध्ये ओल्या चाऱ्याचा तुटवडा.खानदेशात सुमारे १३ लाख मोठे पशुधन असून त्यात दुधाळ जनावरांचा मोठा वाटा आहे. याशिवाय शेळ्या आणि अन्य लहान पशुधनाची संख्याही लक्षणीय आहे. माळराने उजाड पडल्याने पशुधनाला चराईसाठी नेणे शक्य नसून, जनावरांना घरीच चारा पुरवावा लागत आहे..खानदेशात दरवर्षी खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांतून मिळून सुमारे १८ ते १९ लाख टन चारा उपलब्ध होण्याची अपेक्षा असते. यंदा रब्बी हंगामाने साथ दिली असली, तरी खरीपातून अपेक्षित चारा न मिळाल्यास पशुपालकांसमोर गंभीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे..दूध उत्पादकांनी रब्बी हंगामात उपलब्ध झालेला कोरडा चारा साठवून ठेवला आहे. मात्र, हा साठा पुढील दोन महिन्यांपर्यंतच पुरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लवकर समाधानकारक पाऊस होऊन खरीप पिकांची वाढ व्हावी आणि चाऱ्याची उपलब्धता निर्माण व्हावी, अशी अपेक्षा पशुपालक व्यक्त करीत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.