Jalgaon News : खानदेशात खपली गहू पेरणी यंदाही सुमारे ८० ते ९० हेक्टर क्षेत्रात होणार आहे. गेल्या रब्बी हंगामातही पेरणी कमी झाली होती. पेरणी पुढील पंधरवड्यात अनेक भागात होईल. यंदा रावेर, यावल, धुळ्यातील साक्री, नंदुरबारातील शहादा भागात पेरणी होईल. जळगाव, चोपडा भागातही काही शेतकरी खपलीची पेरणी करतील, असे दिसत आहे. .२०२१, २०२२ मध्ये कृषी विभाग व विविध शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनाने खपली गव्हाची पेरणी बऱ्यापैकी झाली. खपली गहू पेरणी वाढून शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा यासाठी कृषी विभागाने जळगाव जिल्ह्यात सुमारे ७५ एकरात बिजोत्पादन कार्यक्रम दोन वर्षांपूर्वी हाती घेतला होता. .Wheat Export : गहू आणि त्यापासून तयार उत्पादनांच्या निर्यातीला परवानगी का नाही?; केंद्र सरकारनं स्पष्टच सांगितलं.पण पुढे त्यावर काम झाले नाही. जिल्ह्यात खपली गव्हाखालील क्षेत्र आणखी वाढावे, असा उद्देश यामागे होता. परंतु खपली गहू मळणीसाठी तंत्रशुद्ध यंत्रणेचा अभाव खानदेशात आहे. यामुळे अनेक शेतकरी हा गहू लागवड, उत्पादन करणे बंद करीत आहेत. या गव्हासंबंधी कृषी विभागाने तांत्रिक मार्गदर्शन व यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे..खपली गहू मळणीअभावी गव्हाचा उपयोगच होत नसल्याची स्थिती आहे. यामुळे मळणीसाठी तंत्रशुद्ध यंत्रणा, आवश्यक सामग्री उपलब्ध करून देण्याचा मुद्दा लाभार्थी शेतकरी उपस्थित करीत आहेत. पण मागील हंगामात कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्रांनी यासंबंधी कार्यक्रम राबविणे टाळले. अनेक शेतकऱ्यांनी बाजारातून खपली गहू बियाणे खरेदी करून त्याची एक ते दोन एकरात पेरणी केली होती. .धुळ्यातही पेरणी झाली होती. पण मळणीसाठी जळगाव, धुळ्यात यंत्रणा नाही. अनेक शेतकरी घरी वापरासाठी गहू तयार करू शकले नाहीत. मळणीसाठी प्रचलित गहू मळणीची यंत्रणा कुचकामी ठरत आहे. गहू मळणीचे हार्वेस्टर, ट्रॅक्टरचलित यंत्रणा, बैलजोडीने ओढले जाणारे थ्रेशरमध्येदेखील या गव्हाची मळणी होत नाही. काही शेतकऱ्यांनी मळणी करून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आले नाही..Wheat Varieties: गव्हाचे तांबेरा आणि करपा रोगासाठी प्रतिकारक वाण .राइस मिलची गरजशेतकऱ्यांचा मळणीवरील खर्च वाया जात होता. मळणीसाठी राइस मिलच्या धर्तीवरची यंत्रणा विविध गावांमध्ये स्थापन करण्याची गरज आहे. मळणी व स्वच्छता व्यवस्थित न झाल्याने या गव्हाची विक्री शेतकरी करू शकत नाहीत. कारण खरेदीदारांना व्यवस्थित सच्छ केलेला गहू हवा आहे. .आरोग्याबाबत जनजागृती होत असून, खपली गव्हास मागणी आहे, पण त्याचा लाभ शेतकरी घेवू शकत नसल्याची स्थिती आहे. खपली गव्हाचे क्षेत्र पुढे वाढवायला हवे. काही शेतकऱ्यांनी पुणे, सांगली जिल्ह्यातून बियाणे आणले आहे. शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यायचा असेल तर शहरे, मोठी गावे किंवा पेरणी झालेल्या क्षेत्रानजीक मळणीसाठी राइस मिलच्या धर्तीवर यंत्रणा उभी करण्याची गरज आहे, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.