Banana Cultivation Khandesh update : खानदेशात मृग बहरातील अर्ली केळी लागवड पुढील आठवड्यानंतर सुरू होणार आहे. यंदा केळी लागवड खानदेशात स्थिर राहील, असे संकेत आहेत. .केळीचे दर यंदा अस्थिर आहेत. जुलै २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत केळी दर अल्प होते. या महिन्यात दरात सुधारणा झाली. पण कमाल दर अजूनही २३०० रुपये प्रति क्विंटल, एवढेच आहेत. यातच इतर पिकांमध्ये शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागला आहे. कारण दर कमी अधिक झाले. केळी पीक शेतकऱ्यांना काही भागात परवडले तर काही भागात तोटा आला. कांदेबाग केळीचे उत्पादन कमी आले. .Banana Cultivation: आगाप मृग बहर केळी लागवडीची तयारी सुरू.जळगाव जिल्ह्यात मृग बहर केळीची काढणी मार्च अखेरीस सुरू होते. तर कांदेबाग केळीची काढणी दसरा सणापासून सुरू होत असते. सध्या पिलबाग, आगाप मृग बहर केळीची काढणी सुरू आहे. या केळीला किमान १२०० व कमाल २३०० रुपये प्रति क्विंटलचा दर आहे. मृग बहर केळीची लागवड मे महिन्यात सुरू होते. अर्ली लागवड मार्चच्या पहिल्या आठवड्यात केली जाते. तर नियमीत लागवड जूनपासून सुरू होते. .Banana Cultivation: दर्जेदार केळी कंद मुबलक; रोपांची मागणी घटली.खानदेशात मृग बहर केळीखालील क्षेत्र अधिक असते. तर कांदेबाग केळीखालील क्षेत्र कमी असते. कांदेबाग केळीची लागवड जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जळगाव, पाचोरा, जामनेर भागात केली जाते. तर मृग बहर केळीची लागवड जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा भागात केली जाते. पण यंदा मृग बहर केळी लागवडदेखील स्थिर राहील. जळगाव जिल्ह्यातील मृग बहर केळी लागवड सुमारे ३० ते ३५ हजार हेक्टरपर्यंत राहू शकते..या केळीसाठी शेतकरी कंदांचा उपयोग करीत आहेत. ही रोपे खानदेशात विविध एजंटतर्फे पुरविली जात आहे. जागेवर दोन ते तीन रुपये प्रतिकंद, असे दर आहेत. चांगल्या उगवणक्षमतेसाठी शेतकरी कंद लागवडीपूर्वी धैंचा, तागाची लागवड करीत आहेत. यामुळे उष्णतेपासून रोपांचे संरक्षण होणार आहे. अर्ली मृग बहर केळी लागवड रावेर, मुक्ताईनगर, नंदुरबारमधील शहादा भागात अधिकची असणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.