Water Inflow Khandesh: यंदा जून महिन्यात पावसाने निराश केले. कमी पावसाने जूनमध्ये सिंचन प्रकल्प भरले नाहीत. पण जुलैत चांगला पाऊस झाल्याने काही प्रकल्प भरले. त्यात सध्या चोपडा व शिरपूर (जि.धुळे) भागातील सातपुडा पर्वतातील अनेर, तापी नदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे..खानदेशातील विविध सिंचन प्रकल्पांतील पाण्याची आवक सुरू आहे. जळगावातील मंगरूळ, सुकी, अभोडा, प्रकल्प जुलैत भरले. त्यातूनही मध्यंतरी विसर्ग सुरू होता. पण तोंडापूर, बोरी आदी सिंचन प्रकल्पांतून विसर्ग सुरू नाही. तापी नदीच्या उगम क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने तापी नदीत पाण्याची आवक सुरू आहे..Satpuda Sinchan Prakalp: सातपुड्यातील प्रकल्पांत पाणी आवकेत घट.यामुळे खानदेशातील तापी नदीवरील हतनूर (ता.भुसावळ), शेळगाव (ता.जळगाव) धुळ्यातील सुलवाडे (ता.शिरपूर), नंदुरबारातील प्रकाशा व सारंगखेडा (ता.शहादा) या बॅरजमधून विसर्ग सुरू आहे. खानदेशात मागील आठवड्यात कुठेही पाऊस झालेला नाही. पाऊस नसल्याने काही प्रकल्पांतील पाणी आवक बंदावस्थेत असल्याची स्थिती आहे..Khandesh Irrigation Stock: खानदेशातील अनेक सिंचन प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’.धुळ्यातही प्रकल्पांत पाणी आवकसध्या धुळ्यातील पांझरा प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे. तसेच नंदुरबारात सुसरी, चिरडे, दरा, देहली या प्रकल्पांतही पाण्याची आवक सुरू होती. पण हे प्रकल्प भरलेले नाहीत. पण नंदुरबारात गोमाई, सुसरी या नद्या प्रवाही आहेत. सातपुड्यात उदय नदीसही प्रवाही पाणी आहे..मन्याड, अग्नावतीत आवकेची गरजजळगावातील मन्य़ाड, अग्नावती, अंजनी, तोंडापूर, वाघूर, बोरी या मध्यम प्रकल्पांतूनही विसर्ग सुरू नाही. हे प्रकल्प भरण्याची प्रतीक्षा आहे. खानदेशातील सर्वात मोठ्या गिरणा नदीवरील चाळीसगावनजीकच्या गिरणा धरणात पाण्याची आवक सुरू आहे. हे धरण १०० टक्के भरले होते. त्यातून मागील आठवड्यात चांगला विसर्ग सुरू होता. नागासाक्या व अन्य सिंचन प्रकल्पांतून गिरणा धरणात पाण्याचा प्रवाह सुरू आहे. यामुळे गिरणा धरणात जलसाठा स्थिर आहे. गिरणा धरणाच्या पाण्याद्वारे चाळीसगावातील मन्याड, एरंडोलातील अंजनी, पारोळ्यातील बोरी, कंकराज आदी प्रकल्पांचे पुनर्भरण करण्यात येते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.